महिन्याभराच्या शांततेनंतर इस्रायलने पुन्हा एकदा हल्ले सुरु केले आहेत. सोमवारी इस्रायली एअर फोर्सने अचानक गाझामध्ये हवाई हल्ले केले. “आम्ही झोपलो होतो. त्यावेळी अचानक मोठे स्फोटाचे आवाज ऐकून उठलो. रात्रीची वेळ असल्याने हल्ले कुठे-कुठे झालं, हे सांगण कठीण आहे” असं कतारच न्यूज आऊटलेट अल-जजीराच्या रिपोर्टरने सांगितलं. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची युक्रेन युद्ध समाप्तीसाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्याचवेळी गाझामध्ये पुन्हा हे हल्ले झाले आहेत. युक्रेन आणि गाजा पट्टीतील युद्ध रोखणं हे ट्रम्प यांचे निवडणुकीतील मुद्दे होते. इस्रायलने पुन्हा हल्ले केले, त्यावरुन असं दिसतय की, ट्रम्प मध्य पूर्वेच्या शांततेसाठी गंभीर नाहीयत. मागच्या 15 महिन्यापासून गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये लढाई सुरु होती.
गाझामध्ये विस्थापित झालेले लोक घर आणि तंबूमध्ये रहात आहेत. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात 200 लोक मारले गेले आहेत. अनेक जण जखमी झालेत. ज्या केंद्रीय क्षेत्रात आम्ही आहोत, तिथल्या आकाशात कमी उंचीवरुन ड्रोन्स आणि फायटर विमानं आम्हाला उड्डाण करताना दिसली. इस्रायलच्या या कारवाईमुळे पॅलेस्टिनी नागरिक भेदरले आहेत. युद्ध विराम कायमस्वरुपी रहावा अशी गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींची इच्छा आहे.
या कारवाईवर इस्रायली सैन्याने काय म्हटलय?
IDF आणि शिन बेटकडून गाझामधील हमासच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं असं या हल्ल्याबद्दल इस्रायली सैन्याने सांगितलं. युद्ध विराम वाढवण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव हमासने अमान्य केल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत पुन्हा सैन्य अभियान सुरु केलय असं इस्रायली पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं. रॉयटर्सने हमासच्या एका सिनियर अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलं आहे की, इस्रायलने 19 जानेवारीलाच युद्ध विराम मोडला.
अवघ्या अर्ध्या तासात किती एअर स्ट्रइक
अवघ्या अर्ध्या तासात इस्रायली सैन्याने 35 पेक्षा जास्त एअर स्ट्राइक केले अशी अनस अल शरीफने एक्सवर माहिती दिली. बचाव पथकं आणि रुग्णवाहिकेला लोकांना वाचवण्यासाठी बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागला.