Dividend Shares : या 4 कंपन्या देणार लाभांश, रेकॉर्ड तारीख याच आठवड्यात
ET Marathi March 18, 2025 01:45 PM
मुंबई : शेअर बाजारातील अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश जाहीर केला आहे. तर काही कंपन्यांनी आधीच लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. यामधील काही कंपन्यांच्या रेकाॅर्ड तारखा या आठवड्यात आहेत. या कंपन्यांबद्दल जाणून घेऊया. 1) एक्सटेल इंडस्ट्रीज लि. ( Axtel Industries Ltd)एक्सटेल इंडस्ट्रीज गुंतवणूकदारांना एका शेअरवर ६ रुपये लाभांश देणार आहे. कंपनीने या लाभांशासाठी 20 मार्च ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सची किंमत 17 टक्क्यांनी घसरली आहे. 2) गॅलक्सी सर्फेक्टेंट्स लिमिटेड (Galaxy Surfactants Ltd)कंपनी एका शेअरवर 18 रुपये लाभांश देत आहे. कंपनीने या लाभांशासाठी 20 मार्च ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सची किंमत 11 टक्क्यांहून अधिक घसरली आहे. 3) मिश्रा धातू निगम लि. (Mishra Dhatu Nigam Ltd )कंपनीने अद्याप लाभांश जाहीर केलेला नाही. मात्र लाभांशाचा निर्णय घेण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची 20 मार्च रोजी बैठक निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी संचालक मंडळ लाभांश देण्याबाबत निर्णय घेईल. संचालक मंडळ सहमत असल्यास 25 मार्च ही लाभांशाची रेकॉर्ड तारीख असेल. मिश्रा धातू निगम लिमिटेडच्या शेअरच्या किमती गेल्या एका वर्षात 23 टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत. 4) रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (RailTel Corporation of India Ltd)हा रेल्वे स्टॉक दुसरा अंतरिम लाभांश देणार आहे. कंपनी पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1 रुपये लाभांश देईल. कंपनीने या लाभांशासाठी 2 एप्रिल ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किमती 8 टक्क्यांनी घसरल्या आहेत.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.