अखेर त्यांचं आगमन होणार… बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी; असं काय सांगितलं की ज्याने…
GH News March 18, 2025 07:15 PM

बल्गेरियातील गूढवादी बाबा वेंगाने अशा काही भविष्यवाणी केल्या आहेत की, त्याने संपूर्ण मानव जगतात धुमाकूळ घातला आहे. त्यांची काही भाकीत अगदी तंतोतंत परिस्थितीशी जुळत असल्याचा दावा पण करण्यात येतो. बाबा वेंगा (Baba Vanga) या एक महिला भविष्यवेत्ता, भविष्यदर्शी असल्याचा दावा करण्यात येतो. त्यांचे पूर्ण नाव वेंगेलिया पांडेवा गुश्तेरोवा (Vangeliya Pandeva Gushterova) असं आहे. त्यांनी 2221 या वर्षाचा उल्लेख केला आहे. हे वर्ष संपूर्ण मानव जातीसाठी भयंकर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ज्यांच्या विषयी मानव जातीला शंका होती, ते पृथ्वीवर येणार आणि त्यांना पाहताच मानवाचा थरकाप उडणार अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. त्यांच्या मते, 2221 मध्ये एलियन्स पृथ्वीवर सर्वांसमोर येणार. आताही अनेक ठिकाणी एलियन्स पाहिल्याचा, UFO दिसल्याचा दावा करण्यात येतो. त्याची छायाचित्र पण काही जण इंटरनेटवर अपलोड करून गोंधळ उडवतात. पण एलियन्स अद्यापही प्रत्यक्ष सर्वांसमोर दिसलेले नाहीत. बाबा बेंगा हिच्या इतरही भविष्य कथन प्रसिद्ध आहे.

युरोप नष्ट होणार

युरोपविषयी बाबा वेंगा यांनी भयावह भविष्यवाणी केली आहे. एका गंभीर आंतरिक संघर्षामुळे युरोप नष्ट होईल असा दावा त्यांनी केला आहे. युरोपमध्ये लोकसंख्या अचानक झपाट्याने नष्ट होईल. ही भविष्यवाणी यावर्षासाठी 2025 साठी करण्यात आली आहे.

विनाशाची सुरुवात

बाबा वेंगाने इशारा दिला आहे की, 2025 मध्ये अनेक विनाशकारी घटनांची मालिकाच दिसून येईल. या घटनांना तिने प्रलयाची सुरुवात असे म्हटले आहे. मानवजातीवर त्यामुळे संकट ओढावणार आहे. मानव पूर्णपणे विलुप्त होण्याची भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. हा मानवासाठी आव्हानांचा काळ आहे, त्यामुळे जगात मोठे बदल होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

विज्ञान आणि वैद्यक शास्त्रात भरीव यश

बाबा वेगांच्या मते, चालू वर्ष 2025 विज्ञान आणि वैद्यक शास्त्रात क्रांतीकारी असेल. प्रयोगशाळेत मानव कृत्रिम अवयवांचा विकास करेल. इतकेच नाही तर कर्करोगासाठी सुद्धा हे वर्ष अभूतपूर्व असेल असे भाकीत तिने केले आहे. कर्करोगावरील उपचारांसाठी हे वर्ष उत्तम असेल असे तिने सांगितले आहे. गेल्यावर्षीच डिसेंबर महिन्यात रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने कर्करोगावर लस शोधल्याचा दावा केला होता, याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?

बाबा वेंगाचा जन्म कुठं झाला?

बाबा वेगांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला होता. तिचा मृत्यू 1996 मध्ये झाला होता. ती जन्मापासूनच आंधळी होती. पण तिने तिच्या आयुष्यात अनेक मोठी भाकीतं केली. त्यातील काही भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा करण्यात येतो. तिच्या अनुयायीनुसार तिच्याकडे काही अलौकिक शक्ती होत्या. त्यांच्या मदतीने तिने ही भाकितं केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.