गरीब म्हातारीचे मृत्यूपत्र वाचलं अन् गावकऱ्यांचे डोळेच पांढरे झाले, कानावरही विश्वास बसेना; हे कसं झालं?
GH News March 18, 2025 07:15 PM

कुणालाही पाहून त्याच्या बाबतचा अंदाज लावता येत नाही. एखादी व्यक्ती फाटकी दिसत असली तरी त्याची मोठ्या असामींसोबत उठबस असू शकते. एखादी व्यक्ती गरीब दिसत असली तरी ती गडगंज श्रीमंत असू शकते. आणि एखादी व्यक्ती सुटबुटात दिसत असली तरी तिच्यावर लाखो, करोडंचं कर्ज असू शकते. अशा व्यक्तीच्या सान्निध्यात आल्यानंतर दोन तीन भेटीतच त्याची माहिती मिळून जाते. त्याशिवाय ती व्यक्ती कशी आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची आर्थिक स्थिती कशी आहे आणि त्याचे विचार कसे आहेत याची माहिती मिळते.

ज्या व्यक्तीकडे गडगंज संपत्ती असते तेच लोक नेहमी त्यांचं मृत्यूपत्र तयार करत असतात. त्यांच्या मृत्यूनंतर हे मृत्यूपत्र वाचलं जातं. गरीब लोक शक्यतो असं काही करत नाही. कारण त्यांच्याकडे वाटण्यासारखं काही नसतं. पण एका गरीब म्हातारीने तिचं मृत्यूपत्र बनवलं. या महिलेचं घर अगदी पडकं होतं. घराची साफसफाई सुद्धा झालेली नव्हती. पण तिच्या मृत्यूनंतर तिचं मृत्यूपत्र वाचल्यावर सर्वांनाच धक्का बसला. हे असं कसं झालं याचा लोकांना विश्वासच बसेना. लोकं आपआपसात चर्चा करायला लागले. पण हे होऊच कसं शकतं? असा सवाल जो तो करत होता.

असं काय होतं मृत्यूपत्रात?

हिल्दा लेवी असं या आज्जीचं नाव होतं. केंटमधील व्हिसिलटेबलमध्ये ती राहत होती. 1970मध्ये बनलेल्या एका सेमी डिटॅच्ड घरात ती राहत होती. वयाच्या 98व्या वर्षी तिचा मृत्यू झाला होता. जेव्हा तिचं मृत्यूपत्र वाचलं गेलं, तेव्हा त्यात 1.4 मिलियन पाऊंड म्हणजे जवळपास 16 कोटी रुपयांचा उल्लेख होता. त्यातील साडे पाच कोटी रुपये तिने तिच्या मित्रांना आणि कँटरबरी रुग्णालयाला दिले होते. तर तीन कोटी रुपये तिने लंडनच्या Whitstable Healthcare and Moorfields Eye Hospital मधील तिच्या मित्राच्या नावे केले होते. तिने चॅरिटीमध्ये दिलेल्या पैशाची माहिती ऐकून तर लोक अधिकच हैराण झाले. महिलेचं घर अत्यंत जीर्ण होतं. तिचं घर पाहिल्यावर ती कोट्यधीश असेल असं कुणालाही वाटलं नव्हतं.

कुठून आला एवढा पैसा?

हिल्दा लेवीकडे एवढा पैसा कुठून आला? याचा शोध घेण्यात आला. तेव्हा अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. 1930मध्ये ती जर्मनीतून इंग्लंडला निर्वासित म्हणून आली होती. होलोकॉस्टमध्ये तिच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला होता. ती अनाथ झाली होती. इंग्लंडमधील एलन जेफरी नावाच्या महिलेने तिला दत्तक घेतले होते. ती डॉक्टर फ्रीडरिक आणि मिसेस इर्मा लेवीची मुलगी होती. तिने इंग्लंडमध्ये तिचं संपूर्ण आयुष्य घालवलं. तिच्या काकाच्या मालमत्तेचा तिला हिस्सा मिळाला होता. तिचे काकानंतर अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांनी त्यांची 300 कोटीहून अधिक संपत्ती बहीण-भाऊ आणि कुटुंब तसेच दूरच्या नातेवाईकांमध्ये वाटली होती. हिल्दा यांनाही तीच प्रॉपर्टी मिळाली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.