नांदगाव- आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव मतदार संघातील मालेगाव व नांदगाव तालुक्यातील बोलठाण व हिसवळ खुर्द येथील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण पंचवीस उपकेंद्राच्या इमारतींच्या नूतनीकरणासाठी एकूण अठरा कोटी ४५रुपयांचा निधी शासनाच्या आरोग्य विभागाने मंजूर केला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य वर्धिनी अभियानातून वर्षानुवर्षे जुन्या व मोडकळीला आलेल्या या आरोग्य केंद्राचा या निधीमुळे कायापालट होण्यास मदत होणार आहे. बोलठाण व हिसवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जुन्या इमारतींच्या जागेवर आरोग्य विषयक सर्व सुविधांसह नव्या इमारती उभ्या राहतील त्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून निधीची तरतूद करण्यात आली आहे.
आरोग्य उपकेंद्रांच्या दुरुस्तीसह रंगरंगोटी सांडपाणी व्यवस्था, अंतर्गत प्रतीक्षा कक्ष, प्रयोग शाळा, वैद्यकीय अधिकारी कक्ष, आंतररुग्ण कक्ष, औषध साठवणी भांडार कक्षांचीही प्राधान्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी प्राधान्यक्रम दिला आहे. प्रसूतिपूर्व व प्रसूतीसेवा, नवजात अर्भक व नवजात शिशुंना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, बाल्यावस्था व किशोरवयीन आरोग्य सेवा; तसेच लसीकरण सेवा, कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक व प्रजननासंबंधी इतर आरोग्य सेवा, सामान्य संसर्गजन्य रोग नियोजन यासह अन्य सुविधांचा समावेश राहणार आहे.
या केंद्रांना लाभ
मालेगाव तालुक्यातील गिगाव, जळगाव नि, सावकारवाडी, सोनज, घोडेगाव, चिंचगव्हाण, जातपाडे,येसगाव, जेऊर व दहिवाळ, गावांचा समावेश आहे तसेच - नांदगाव तालुक्यातील बोलठाण, कासारी , जातेगाव, परधाडी, साकोरा , तळवाडे, पोखरी , बाणगाव,कोंढार , मांडवड वंजारवाडी, वडाळी व हिसवळ खुर्द, वेहळगाव, पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता वोलठाण व हिसवळ खुर्द