Maharashtra Live Updates : नागपुरात राड्यानंतर तणावपूर्ण शांतता, संचारबंदी लागू; पोलिस बंदोबस्त तैनात
Sarkarnama March 18, 2025 08:45 PM
Maharashtra News LIVE : सुनीता विल्यम्स यांची उद्या होणार 'घर' वापसी

तब्बल नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांच्या परतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. त्या भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे पृथ्वीवर परत येतील.

Nagpur Violence : नागपुरात राड्यानंतर तणावपूर्ण शांतता, संचारबंदी लागू; पोलिस बंदोबस्त तैनात

Nagpur Stone Pelting : उपराजधानी नागपुरात दोन गटात उसळलेल्या संघर्षानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (ता.17) रात्री झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीनंतर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या येथील वातावरण तणावपूर्ण असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा घटनेनंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना ताब्यात घेतलं आहे.

Nagpur Stone Pelting Live : नागपुरातील 'या' भागात संचारबंदी लागू

नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी (ता.18) रात्री दोन गटांमधील वादाला हिंसक वळन लागले. यामुळे येथे तोडफोड आणि जाळपोळ झाली. ज्यात अनेक वाहने जाळण्यात आली असून, दगडफेक झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी, विजय वडेट्टीवार यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. तर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरातील परिमंडळ 3, 4 आणि 5 मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात परिमंडळ 3 मधील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपवली, शांती नगर तर परिमंडळ 4 मधील सक्करदरा, नंदनवन आणि इमामवाडा आणि परिमंडळ 5 मधील यशोधरा नगर, कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीचा समावेश आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.