प्रसिद्ध डान्स क्विन मलायका अरोराचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये तीन १६ वर्षांच्या मुलाला त्यांच्या गैरवर्तवणुकीवर चांगलाच खडसावताना दिसत आहे. मलायका अरोरा नेहमीच फिटनेस असो वा कोणते गाणे नेहमीच प्रेक्षकांचा चर्चेचा भाग असते. तिच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामधील चर्चा प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतात.
सध्या मलायका 'हिप हॉप इंडिया सीझन २' या शोमध्ये परिक्षक म्हणून दिसली आहे. त्यातील एका स्पर्धक मुलावर तीने जोरदार राग काढल्याचं पाहायला मिळालं आहे. व्हिडीओमध्ये त्याला म्हणाली, ' तु १६ वर्षांचा आहे, आणि मला डान्स करताना एकटक बघतोस, डोळा मारतोस, चुंबन देतोस? तु मला तुझ्या आई-वडिलांचा नंबर सांग. तुझं वय अजून १६ वर्षचं आहे...' हे म्हणताच तिथले स्पर्धक चिंतेत येतात. ही घटना सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतेय. पण पुढे या घटनेचं काय घडलं हे जाणून घेऊया.
बॉलिवूडची डान्स क्वीन मलायका अरोरा पापाराझीच्या निगराणी खाली सतत असते असे आपण म्हणू शकतो. त्यातचं मलायका अरोराने 'हिप हॉप इंडिया सीझन २' मध्ये परिक्षक म्हणून सहभाग घेतला आहे. त्यातीलच एक किस्सा सोशल मिडीयावर होत आहे. त्यात १६ वर्षांचा मुलगा आहे. त्याचे नाव नविन आहे. तर नविन ने एक बॉलिवूडमधील फेमस गाणं ' क्या बात है' या गाण्यावर डान्स केला.
नविनचा डान्स पाहून मलायका आणि तिच्यासोबत असणारा दुसरा परिक्षक म्हणजेच रेमो डिझुझा चकीत होतात. त्याच्या डान्सवर प्रतिक्रीया देताना मला म्हणते, ''तुझा फोन नंबर काय आहे'' तर रेमो म्हणतो की, त्याचा नाही त्याच्या आई-वडीलांचा विचार आणि म्हणून मलायका मस्करीत ज्या काही गोष्टी म्हणते त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.