'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5) विजेता सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'झापुक झुपूक' चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. अलिकडेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. नुकताच या धमाकेदार चित्रपटाचा टीझर (Zapuk Zupuk Teaser ) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
टीझरच्या व्हिडीओला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आता सगळीकडे आपलीच हवा...कारण आपल्या 'झुपूक' पिक्चरचा Teaser आला ना भावा!कसं, एकदम "गोलीगत sqrqzq बुक्कीत टेंगूळ" तुमच्या अख्यांचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावर असाच राहू द्या आणि माझ्या Teaser ला एकदम सुपर डुपर हिट करा!" टीझरवर चाहत्यांकडून प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच चाहते सूरजच्या अभिनयाचे कौतुक करत आहे. त्याला चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.
टीझरमध्ये सूरजच्या जबरदस्त डायलॉगने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. टीझरमध्ये सूरज बोलताना दिसतो की, "मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला चव्हाणच्या नजरेतच दम आहे" या सूरजचे वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहे. ४५ सेकंदाच्या टिझरमधील सूरजच्या लूकने चाहते घायाळ झाले आहे. चित्रपटात सूरजची हटके स्टाईल आणि भन्नाट कॉमेडी पाहायला मिळणार आहे. टीझरमधील शेवटचा क्षण डोळ्यात पाणी घेऊन येतो.
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित आहे. या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सूरजसह जुई भागवत, इंद्रनील कामत, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे आणि पायल जाधव पाहायला मिळणार आहेत. 'बिग बॉस मराठी 5' च्या विजयामुळे सूरज चव्हाणला लोकप्रियता मिळाली आहे. आता लवकरच सूरजचे नवीन घरीही बांधून होणार आहे.