नागपूर येथील दंगलीला विरोधकांनी नितेश राणेंच्या मागील काही काळातील वक्तव्य जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, माझा राजीनामा कुणीही मागितलेला नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या प्याद्यांपैकी मी एक आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत राणेंचं नाव आहे. त्यामुळे कुणाला चिंता करण्याची गरज नाही, अशा शब्दात आपल्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणतीही तंबी दिली नसल्याचं स्पष्ट केलं भाजप आमदार नितेश राणे यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी तंबी दिल्याच्या चर्चा सुरू होत्या यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Shobha Bachhav : राज्याचे मुख्यमंत्री अपयशी ठरलेत : शोभा बच्छावनागपुरात झालेल्या दंगलीवरून काँग्रेस खासदार शोभा बच्छाव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार थांबवा असंही म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, किरीट सोमय्या मालेगावात येऊन गेल्यानंतर अचानक बांगलदेशी लोक शोधण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे. मात्र, जे प्रामाणिक आणि देशप्रेमी मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये. अल्पसंख्याकांवर अत्याचार थांबले पाहिजेत. नागपूर दंगलीवर बोलताना त्या म्हणाल्या, "राज्याचे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. गृहमंत्र्यांनी तातडीने लक्ष घातले पाहिजे, परिस्थिती नियंत्रणात ठेवली पाहिजे."
Swargate Rape Case : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकीलावर हल्लास्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचे वकील साहील डोंगरे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (ता.17) संध्याकाळी हडपसर येथून अपहरण करुन त्यांना बोपदेव घाटात नेऊन मारहाण करुन सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी डोंगरे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून सध्या त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Santosh Deshmukh : देशमुख कुटुंबीयांना एकनाथ शिंदे पक्के घर बांधून देणार; नारायगडाच्या मठाधिपतींच्या हस्ते आज भूमिपूजनउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना हक्काचे घर बांधून देण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन आज नारायगडाचे मठाधिपती शिवाजी महाराजांच्या हस्ते केले जाणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबाची जबाबदारी शिंदे यांनी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून देशमुख कुटुंबीयांना पक्के घर बांधून दिले जाणार आहे.
Satish Bhosale : सुरक्षेच्या कारणास्तव सतीश भोसलेची बीडच्या कारागृहात रवानगीबीड जिल्ह्यातील सतीश भोसले ऊर्फ खोक्या याला शिरूर कासार न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याला शिरूर कासार येथील पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव सतीश भोसले याला शिरूर पोलिस ठाण्यातून बीडच्या पोलिस ठाण्यात हलविण्यात आले आहे. वीस मार्च रोजी सतीश भोसले याची पोलिस कोठडी संपणार आहे
Nagpur Violence : अकरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीनागपूरमधील संपूर्ण घटनेत 33पोलिस जखमी झाले आहेत, त्यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलिस अधिकारी आहेत. या हल्ल्यात एकूण पाच नागरिक जखमी झाले आहेत, त्यातील तिघांना उपचार करून घरी सोडले आहे, तर एक अतिदक्षता विभागात आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले असून तहसील पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अकरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Nagpur Violence : पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही : देवेंद्र फडणवीसपोलिसांवर ज्यांनी हल्ला केला आहे, त्यांना काहीही झालं तरी सोडणार नाही. पोलिसांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही. पोलिस शांतता प्रस्थापित करत होते, अशावेळी त्यांच्यावर केलेला हल्ला अत्यंत चुकीचा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना जाहीर केले.
Eknath Shinde Live: औरंग्यांचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाहीः शिंदेऔरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलक आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितले. त्याचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाई होणार असून औरंग्यांचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही, त्याची बाजू घेण्याचा केविलवाणी प्रयत्न काही जण करीत आहेत. अशा देशद्रोहींवर कडक कारवाई करणार, असे शिंदे म्हणाले.
Nagpur Violence News : अधिवेशनात पडसादनागपूर दंगलीच्या निषेधार्थ आज विधीमंडळ परिसरात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी आंदोलन केले
Israel Air Strike : इस्रायलमध्ये एअर स्ट्राइकमध्ये 200 जणांचा मृत्यूIsrael : महिनाभराच्या युद्ध बंदीनंतर इस्रायलने मोठा हवाई हल्ला झाला आहे. हा हल्ल्यात 200 जणांचा मृत्यू झाला आहे.'आम्ही झोपलो होतो. त्यावेळी अचानक मोठे स्फोटाचे आवाज ऐकून उठलो', असे स्थानिक नागरिकांनी सांगितलं. गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या 15 महिन्यापासून लढाई सुरु होती.
Yogesh kadam Live : नागपूर हिंसाचाराची चौकशी केली जाईल : योगेश कदमनागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर येथे संचारबंदी लागू करण्यासह रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर पोलिसांनी 50 जणांना ताब्यात घेत कारवाई सुरू केली आहे. यादरम्यान या घटनेची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.
Maharashtra Live : नागपूर हिंसाचारानंतर पोलिस सतर्कनागपूरमध्ये दोन गटात झालेल्या हिंसाचारानंतर आता राज्यातील पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता नागपूरमध्ये असून आता येथे काही भांगात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यानंतर आता राज्यातील संवेदशनील ठिकाणी अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
Nagpur Violence News : "भाजपमधील काही लोक द्वेष पसरवताहेत, अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे"नागपुरच्या महाल परिसरात सोमवारी (ता.18) रात्री मोठा हिंसाचार झाला. ज्यात अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. दगडफेकही झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यावर एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी प्रतिक्रिया देताना, हिंसाचाराचा निषेध केला आहे. तसेच त्यांनी, या घटनेचा आम्ही निषेध करत असून महाराष्ट्र सरकारने असा हिंसाचार का घडला याची चौकशी करावी. भाजपमधीलच काही लोक द्वेष पसरवत आहेत. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर भाजप 400 वर्षे जुन्या औरंगजेबाचा मुद्दा उपस्थित करून लक्ष विचलित करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Nagpur Violence News : नागपुरात संचारबंदी लागू आता रस्तेही बंद? पोलिसांनी केली अधिसूचना जारी!मंगळवारी (ता.17) रात्री भडकलेल्या हिंसाचारानंतर नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यानंतर आता येथे प्रभावित परिसरातील रस्तेही बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे.
Beed Sarpanch Murder Case News : धक्कादायक! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेने मागितला होता शस्त्र परवानासरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटेने देशमुख हत्या प्रकरणाच्याआधी शस्त्र परवाना मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासाठी त्याने पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र त्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले. विष्णू चाटे हा अजित पवार गटाचा केज तालुकाध्यक्ष होता. मात्र देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक होताच त्याची हकलपट्टी करण्यात आली होती.
LIVE News Updates : आष्टी हत्याकांडातील सहा आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडीबीड जिल्हातील आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी या गावातील ट्रक चालक म्हणुन काम करणाऱ्या विकास बनसोडे यांची अत्यंत निर्घुण करण्यात आली होती. ही हत्या प्रेम प्रकरणाच्या संशयावरून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर त्याला दोन दिवस घरात डांबुन ठेवून बेदम मारहान केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या हत्या प्रकरणी दहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर या सहा जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर इतर चार आरोपी अद्याप फरार आहेत.
Maharashtra News LIVE : सुनीता विल्यम्स यांची उद्या होणार 'घर' वापसीतब्बल नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांच्या परतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. त्या भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे पृथ्वीवर परत येतील.
Nagpur Violence : नागपुरात राड्यानंतर तणावपूर्ण शांतता, संचारबंदी लागू; पोलिस बंदोबस्त तैनातNagpur Stone Pelting : उपराजधानी नागपुरात दोन गटात उसळलेल्या संघर्षानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (ता.17) रात्री झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीनंतर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या येथील वातावरण तणावपूर्ण असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा घटनेनंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना ताब्यात घेतलं आहे.
Nagpur Stone Pelting Live : नागपुरातील 'या' भागात संचारबंदी लागूनागपूरच्या महाल परिसरात सोमवारी (ता.17 ) रात्री दोन गटांमधील वादाला हिंसक वळन लागले. यामुळे येथे तोडफोड आणि जाळपोळ झाली. ज्यात अनेक वाहने जाळण्यात आली असून, दगडफेक झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी, विजय वडेट्टीवार यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. तर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरातील परिमंडळ 3, 4 आणि 5 मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात परिमंडळ 3 मधील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपवली, शांती नगर तर परिमंडळ 4 मधील सक्करदरा, नंदनवन आणि इमामवाडा आणि परिमंडळ 5 मधील यशोधरा नगर, कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीचा समावेश आहे.