इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलचा हा १८ वा हंगाम आहे.
गेल्या १८ हंगामात अनेक विक्रम आत्तापर्यंत झाले आहेत. आयपीएलमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिकवेळा नाबाद राहणाऱ्या ५ खेळाडूंबद्दल आज आपण जाणून घेऊ.
अष्टपैलू युसूफ पठाणने आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना २२ वेळा नाबाद राहत संघाला विजय मिळवू दिला आहे.
डेव्हिड मिलरनेही आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना २२ वेळा नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला आहे.
यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना २४ वेळा नाबाद राहिला आहे आणि त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे.
अष्टपैलू रविंद्र जडेजाने आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना २७ वेळा नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला आहे.
आयपीएलमध्ये एमएस धोनीने धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक २८ वेळा नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला आहे.
ही आकडेवारी २१ मार्च २०२५ पर्यंतची असून त्यात वेळेनुसार बदल होऊ शकतात.