आयपीएलच्या बहुप्रतिक्षित 18 व्या मोसमाची साऱ्या क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मोसमातील पहिला सामना हा बंगळुरु विरुद्ध कोलकाचा यांच्यात होणार आहे. तर मुंबई विरुद्ध चेन्नई दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी 23 फेब्रुवारीला आमनेसामने असणार आहेत. मुंबईचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या याला मोहिमेतील पहिल्या सामन्यात खेळता येणार नाही, हे आधीपासूनच स्पष्ट होतं. त्यामुळे हार्दिकच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध मुंबईचं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईचा कर्णधार निश्चित करण्यात आला आहे. कर्णधार हार्दिक पंड्याने पत्रकार परिषदेत चेन्नईविरुद्ध कोणत्या खेळाडूकडे कर्णधारपदाची सूत्र असणार? याबाबतची माहिती स्वत: हार्दिकने पत्रकार परिषदेतून दिली आहे.
हार्दिक पंड्या याला 1 सामन्याची बंदी घालण्यात आल्याने त्याला चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खेळता येणार नाहीय. कर्णधार हार्दिकने गेल्या हंगामात (IPL 2024) एकच चूक 3 वेळा केली. हार्दिक एकूण 3 वेळा ओव्हर रेट कायम राखू शकला नव्हता. त्यामुळे हार्दिकवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. त्यामुळे हार्दिक चेन्नईविरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये नसणार.
हार्दिक आणि मुंबईचा हेड कोच या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेत चेन्नईविरुद्ध कोण कॅप्टन असणार? याबाबत सांगितलं. मी नसेल तर सूर्यकुमार पहिल्या सामन्यात नेतृत्व करु शकतो. तसेच मुंबईने सोशल मीडियावर पोस्ट करत सूर्यकुमार चेन्नईविरुद्ध कर्णधार असेल, असं जाहीर केलं आहे.
सूर्यकुमार यादव चेन्नईविरुद्ध नेतृत्व करणार
चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स टीम : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, जोफ्रा आर्चर, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकल्टन, दीपक चाहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, केएल श्रीजीत, रीस टॉप्ली, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, वी. सत्यनारायण, बेवन जॅकब्स, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, कॉर्बिन बॉश आणि अश्वनी कुमार.