शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो समर्थकांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गनिमी काव्याने भूमिगत होऊन रविकांत तुपकर मुंबईत दाखल होणार होते, पण खालापूर पोलिसांनी त्यांना आज दुपारपर्यंत नढाळ येथील पंचायत मंदिरात रोखून ठेवले आहे. मुंबईकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाड्या अडवून ठेवल्या आहेत.राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. परंतु त्यांना पोलिसांनी खालापूर इथे रोखून धरले. शासनाच्या या कृतीचा तुपकर यांनी निषेध केलाय.
भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्यावर महाराष्ट्र सरकारने गुन्हा दाखल कराव - संभाजी ब्रिगेडउठ सूट कुणीही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवरायांचा अवमान आणि बदनामी करत आहे.
भाजपचेच सगळे वाचाळवीर शिवरायांचा अवमान करण्यात पुढे आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मी शिवाजी महाराज होते अशा पद्धतीचं संसदेच्या सभागृहात वक्तव्य करणे हे अत्यंत निषेधार्य आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध...
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.
'छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना फक्त स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते.'
भाजपच्या खासदाराचं दुर्दैवी आणि आक्षेपार्ह वक्तव्य हे प्रशांत कोरटकर सारख्या शिवद्रोहींना पाठबळ देणार आहे.
औरंग्याच्या कबरीवर आग पकड करणारे सत्ताधारी मंत्री राणे आणि त्यांच्या लोकांनी पुरोहित प्रकरणावर तोंड उघडावे.
मुख्यमंत्र्यांनी शिवद्रोह्यांना तात्काळ पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.
Amaravati: ५ हजाराची लाच मागणारा पीएसआय दर्शन दिकोंडवार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यातअमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पीएसआय दर्शन दिकोंडवार व गाडी चालक पोलीस सुकेश सारडा यांना पाच हजार रुपयाची लाच मागीतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे,
ट्रॅक्टरची ट्रॉली सोडून देण्यासाठी 5 हजार रुपयाची मागणी या लाचखोर पोलीस अधिकारी व त्याचा सहकारी गाडी चालकाने केली..
यात चक्क नांदगाव पोलीस स्टेशनच्या आवारातच लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.
मात्र वेळेवर संशय आल्याने ती रक्कम घेतली नाही, मात्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल करून दोन्ही लाचखोर पोलिसांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केली आहे,
दरम्यान या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे
तीन दिवसा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर खरेदी विक्रीचे कार्यालय फोडून टाकू - ठाकरे गटाचे पराग गुडधे यांचा इशाराअमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेड अंतर्गत शासकीय हमीभावाने सोयाबीनची विक्री केली..
मात्र अमरावती तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीचे पैसे अद्यापही मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे धाव घेत तात्काळ पैसे देण्याची मागणी केली
अमरावती खरेदी विक्री संघाच्या अनागोंधी कारभारामुळे शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे,
31 मार्च पर्यंत कृषी कर्ज शेतकरी बँकेत न भरल्यास त्यांना विनाकारण व्याजाचा भूदंड बसणार आहे.
त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना नाफेड विक्रीचे सोयाबीनचे पैसे द्यावे अशी मागणी ठाकरे गटाचे अमरावती जिल्हा प्रमुख पराग गुडधे यांनी केली जर तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही आणि शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या व त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल केले नाही तर शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष येणाऱ्या तीन दिवसानंतर खरेदी विक्रीचे कार्यालय फोडून टाकेल असा इशारा पराग गुडधे यांनी दिला
Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात आढळले मद्य आणि सिगरेटचे पाकिटेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील मद्य आणि सिगरेट पाकिटे आढळून आल्यानंतर आता विद्यापीठाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
विद्यापीठाने या प्रकरणात ३ विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई केली आहे. इतकचं नव्हे तर ज्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील खोल्यांमध्ये हे आढळून आले होते
त्या विद्यार्थिनींच्या पालक आणि विभाग प्रमुखांकडून यापुढे असे कृत्य होणार नाही याची लेखी हमी घेण्यात आली आहे.
काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या, सिगरेट पाकिटे तसेच अमली पदार्थ मिळून आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाकडून कारवा
Pandharpur: विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणारविठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यासाठी येत्या 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे.
1 एप्रिल ते 31 जुलै या चार महिन्यांसाठी ही नोंदणी होणार आहे. यामध्ये भाविकांना चंदन उटी पूजेची नोंदणी करता येणार आहे.
मंदिर समितीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा ऑनलाईन पध्दतीने नोंदणी सुरू केली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरीमहाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज रंगपंचमीचा उत्सव विविध प्रकारच्या रंगांची उधळण करीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.
तुळजाभवानीला महाअलंकार,महावस्त्र परिधान करून देवीला कोरडे आणि नैसर्गिक रंग लावून रंगांची देवीच्या मुख्य गाभाऱ्यात रंगाची उधळण करण्यात आली.
देवीच्या अभिषेकानंतर विधिवत महाआरती करून देवीचे मुख्य पुजारी, महंत आणि सेवेकरी, मंदिर प्रशासनचे अधिकारी यांनी देवीला नैसर्गिक रंग लावून तुळजापुरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली.
विविध रंग देवीला लावल्यामुळे देवीचे रूप अगदीच सुंदर दिसत असल्याने भाविकांनी देखील दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूशिरूर तालुक्यातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले सध्याला पोलीस कोठडीमध्ये आहे त्याचे पोलीस कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे
तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे यामध्ये सतीश उर्फ खोकला भोसले ची पत्नी बहीण आणि काही नातेवाईकांनी आमरण उपोषणांमध्ये सहभाग नोंदवला आहे
आमचं अज्ञात लोकांकडून घर जाळण्यात आलं त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात यावी त्याचबरोबर बावी येथील ढाकणे पिता पुत्रांनी आम्हाला चुकीची वागणूक देऊन आम्हाला मारहाण केली त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे
मात्र त्यांना तात्का अटक करावी त्याचबरोबर वनविभागाने अति घाई करून आमचं घर पाडलं आम्हाला रस्त्यावरती आणलं आमची लेकरं रस्त्यावरती आले आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती या उपोषणांमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले च्या पत्नीने केली आहे.
Pandharpur: पंढरपूर तालुक्यात झाडांसोबत साजरी केली रंगपंचमीआज रंगपंचमी सर्वत्र उत्साह साजरी केली जात असतानाच पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील पर्यावरण प्रेमींनी झाडांना रंग लावून आगळ्यावेगळ्या पद्धतीने पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी केली.
लेकीचे झाड अभियानांतर्गत ज्ञानेश्वर दुधाने यांच्या संकल्पनेतून गावातील तरुणांनी एकत्रित येऊन झाडांसोबत रंगपंचमी साजरी केली.
झाडांना नैसर्गिक रंग लावून येणाऱ्या कडक उन्हाळ्यात झाडे जगवण्याचा अभिनव संकल्प करण्यात आला.
झाडांसोबत साजरी झालेली रंगपंचमी सध्या पंढरपूर तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
Yavatmal: भरधाव कंटेनरची कारला धडक,एक जण जागीच ठार; तर दोघेजण गंभीरभरधाव असलेल्या कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला
तर दोघेजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना अमरावती रोड मार्गावरील यवतमाळच्या लोहारा परिसरात घडली आहे.
विशाल देशमुख असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून युवराज परिहार. नितीन मिश्रा असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जखमी दोघांनाही उपचार अर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे तिघेजण यवतमाळ वरून नेर कडे जात असताना हा अपघात झाला अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
Nashik: कल्पना चुंबळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती- कलपना चुंबळे यांची नाशिकच्या बाजार समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवड
- देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर बाजार समितीची झाली निवडणूक
- राष्ट्रवादीचे ( AP ) नेते देविदास पिंगळे यांच्या विरोधात 18 पैकी 15 संचालकांनी आणला होता अविश्वास प्रस्ताव
- आजच्या निवड प्रक्रियेवर देविदास पिंगळे यांचा बहिष्कार
- गिरीश महाजन यांच्याच आदेशाने अविश्वास प्रस्ताव आणल्याचा पिंगळे यांचा पुनरुच्चार
- या संपूर्ण प्रकरणाची माहिती अजित पवार यांना दिल्याची देखील देविदास पिंगळे यांनी दिली माहिती
- दोन वर्षांपूर्वी माझ्या पॅनल मध्ये निवडून आलेल्या संचालकांनी गद्दारी केल्याचे आरोप
Beed: देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 98 दिवसापासून फरारसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 98 दिवस पूर्ण झालेत.
मात्र यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडणे अतिशय गरजेचे आहे.
कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता धनंजय देशमुख यांनी वर्तवली आहे.
कृष्णा आंधळेला लवकरात लवकर पकडून जेर बंद करावे आणि यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असं धनंजय देशमुख यांनी म्हटले.
कृष्णा आंधळे कडे जास्त पुरावे असतील. त्यामुळे तो पोलीस यंत्रणेच्या ताब्यात येण्यासाठी एवढी दिरंगाई करतो आहे.
तर नक्कीच त्याच्याकडे ठोस पुरावे असतील आणि त्याची चौकशी गरजेची आहे.
उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्याविरोधात खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखलऔरंगजेबाच्या कबर प्रकरणे सामना वृत्तपत्रात संपादकीय मथळ्यातून "हिंदू तालिबानी" असा उल्लेख करण्यात आला आहे,
क्रूर संघटनेची उपमा देऊन जाणीवपूर्वक हिंदू समाजाचा अपमान केला गेल्याने हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यामुळे सामना वृत्तपत्राचे संपादक उद्धव ठाकरे, व्यवस्थापकीय संपादक संजय राऊत, आणि प्रकाशक सुभाष देसाई यांच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहर पोलीस ठाण्यात ऍड शेखर जोशी यांनी तक्रार दाखल केली आहे,
तिघांवरही गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे...
Amravati: अमरावती जिल्ह्यात 15 दिवसात तब्बल 457 लोकांना मोकाट कुत्र्यांचा चावाअमरावती शहरासह ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट...
मागील काही महिन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात कुत्रा चावा घेण्याच्या घटनेत झाली वाढ..
जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजच्या लशीचा साठा कमी..
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी..
Latur School: उन्हाची तीव्रता वाढल्याने लातूर जिल्ह्यातल्या शाळा सकाळच्या सत्रात, सकाळी 8 ते 1 ची शाळेची नवीन वेळलातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढ चालला आहे..
उन्हाचा पारा वाढल्याने, जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भराव्यात अशी मागणी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती
तर मी त्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळा ह्या सकाळी 8 ते दुपारी 1 च्या वेळेत भरवण्याच्या सूचना दिल्या आहेत..
दरम्यान मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा वाढल्याने पुढच्या काळात देखील तापमान वाढीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे...
Washim: चोरद येथील रस्त्यांचे काम तीन महिन्यांपासून रखडले, नागरिक त्रस्तवाशिमच्या चोरद येथील रस्त्याची दुरवस्था झाल्यानं रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलं होतं.
मात्र हे काम अत्यंत संथ गतीनं सुरु असून केवळ 1 किलोमीटर असंलेलं काम तीन महिने उलटूनही पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळं चोरद येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
विद्यार्थी, कामगार, दूध व्यवसाय करणारे शेतकरी यांना प्रामुख्याने रस्त्याच्या अपूर्ण अवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर सर्वत्र खडी, माती, पसरवण्यात आली असून दुचाकीस्वारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ह्या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
Shirdi: साई मूर्तीसह समाधी विविध रंगात रंगली, शिर्डीच्या साई मंदिरात रंगपंचमीचा उत्साहसाईबाबा आज विविध रंगात रंगले असून शिर्डीत रंगपंचमीचा उत्साह बघायला मिळतोय..
साई समाधी आणि साईमुर्तीवर घातलेल्या सफेद शालीवर आकर्षक रंगाची उधळण करण्यात आली असून कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह साखरेच्या गाठीची माळ साईमुर्तीला घालण्यात आली आहे..
तर साई समाधीवर बाल कृष्णाचा फोटो ठेवण्यात आलाय..
आज चार वाजता रंगाची उधळण करत साईरथाची मिरवणूक काढण्यात येणार असून हजारो भाविक आज शिर्डीत रंगपंचमी साजरी करणार आहेत...
Nandurbar: नंदुरबार शहरातून काढण्यात आली जगदंबा देवी अवताराची मिरवणूकसाडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या नंदुरबार शहरातील बालाजी वाडा भागातील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या होलिका उत्सवाची दिवशी सांगता झाली असून पारंपारिक डफाचा वाद्यात होलिका उत्सवाचा पंचमीनिमित्त नंदुरबार शहरातून जगदंबा देवी अवताराची मिरवणूक काढण्यात आली रात्री उशिरापर्यंत या मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीला नंदुरबारकरांनी उदंड प्रतिसाद दिला असून यावेळी जगदंबा देवी आणि महिषासुर यांचा युद्धाचा देखावा सादर करण्यात आला.. हि मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते..
Beed: अतिमारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव आणि शॉकमध्ये जाऊन तरुणाचा मृत्यूबीडच्या आष्टी तालुक्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. या अहवालातून विकास बनसोडेच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.
अति मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव आणि शॉक मध्ये जाऊन विकासचा मृत्यू झाला. विकाच्या अंगावर भरपूर मारहाण झाली. शरीर काळे निळे झाले.
त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने तो शॉक मध्ये गेला. आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद झाले आहे.
विकास बनसोडे या तरुणाचे आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर याच्या मुलीशी प्रेम संबंध असल्याचा संशय होता.
12 मार्चला विकास पिंपरी येथे आला होता. त्यानंतर त्याला ही मारहाण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
विकास बनसोडे हत्या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक
बनसोडे हत्या प्रकरणात दहा जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यातील आठ आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना आहे.