आयपीएल 2025 स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याने होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेकीचा कौल होईल आणि 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. कोलकाता आणि बंगळुरु या स्पर्धेत 34 वेळा आमनेसामने आले आहेत. यात कोलकात्याचं पारडं जड दिसत आहे. कोलकात्याने 20, बंगळुरुने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. मागच्या दोन पर्वात कोलकाता कायम बंगळुरुवर भारी पडली आहे. 2023 आयपीएल स्पर्धेत दोन्ही सामने, तर 2024 आयपीएल स्पर्धेतही दोन्ही सामन्यात पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वातही तसंच काही झालं तर हॅटट्रीक होईल. पण यावेळी संघाची पुनर्बांधणी झाल्याने वाटते तितकं सोपं नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नेतृत्व रजत पाटिदारकडे आहे. तर कोलकात्याचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे. असं सर्व गणित असताना दोन्हीकडच्या चाहत्यांना वेगळीच चिंता लागून आहे. कारण 22 मार्चचा सामना होईल की नाही याबाबत आता शंका उपस्थित होत आहे. कारण या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात पावसाची शक्यता आहे. सामन्याच्या दिवशी 10 टक्के पावसाची शक्यता आहे. पण हवामान बदललं तर 70 टक्क्यांपर्यंत ही शक्यता वाढू शकते. रात्री 11 वाजता पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे. पण तिथपर्यंत सामन्याचा निकाल जवळपास स्पष्ट झाला असेल. पण जर सामन्यातच पाऊस पडला आणि रद्द करण्याची वेळ आली तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. पण स्पर्धेची सुरुवात अशा पद्धतीने होऊ नये यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
केकेआर : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, अंगकृष रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, ॲनरिक नोर्टजे, हर्षित राणा, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, मयंक जॉन मार्केन्सन, मयंक पानवडे, मानिश रोंडे, पो. लवनीथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, चेतन सकरिया
आरसीबी : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक दार, सुयश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान थुशारा, मनोज बंडल, मनोज बंधू, जॉब, बिनबुड, स्व. चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.