झोप येण्यात येतोय अडथळा, या 5 प्रकाराच्या फूड्सची मिळेल मदत, पाहा कोणते?
GH News March 20, 2025 12:11 AM

आपल्या रोजच्या मानसिक आणि शारीरिक झीज भरुन काढण्यासाठी चांगली झोप येणे गरजेचे असते. परंतू जर झोप नीट येत नसली तर सगळा दिवस आळसात जातो.ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे अशा अनेक पदार्थांचा वापर जर आहारात केला तर आपल्याला चांगली झोप मिळू शकते.या सर्व पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

प्रोबायोटिक्स –

प्रोबायोटिक्स जिवित सुक्ष्मजीव असतात. ज्याचं सेवन केल्याने अनेक प्रकारचे फायदे मिळतात.सर्वसाधारणपणे पोटातील मायक्रोबायोटात यामुळे सुधार होतो. एका अभ्यासात ४० आरोग्यदायी उमेदवारांना चार आठवडे रोज २०० मिलीग्राम प्रोबायोटिक्स देण्यात आला. त्यामुळे त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. दही, छास,फर्मेंटेड दूधात प्रोबायोटिक असते.

प्रीबायोटिक-

आमच्या गॅस्ट्रोइंटेस्टाईनल ट्रॅक्टमध्ये सुमारे १०० ट्रिलियन सुक्ष्मजीव असतात. या गटात मायक्रोबायोमच्या रुपात जानने मानले जात होते. एका चांगल्या हेल्दी पोट असले तर चांगली झोप मिळते. लसूण, कांदा, केळे, सोयाबिन गहू , सीरियल्स आदीत प्रीबोयोटिकचे प्रमाण जास्त आढळले जाते.

फर्मेंटेड फूड-

फर्मेंटेड फूडमध्ये एका प्रक्रियेचा वापर करुन प्रिझर्व्ह केले जाते.त्यामुळे जेवणाची शेल्फ लाईफ वाढत असते. न्युट्रिशनल व्हॅल्यू वाढते आणि हेल्दी प्रोबायोटिक्सचे प्रमाण पोटात वाढते. किमची, चीझ आणि सारडो, योगर्ट आदी फर्मेंटेड फूडय या यादी समाविष्ट आहेत.

पोस्टबायोटिक्स-

पोस्टबायोटिक्स निष्क्रिय सूक्ष्मजीव वा त्यांचे कंपाऊंड असतात. ते जेव्हा उत्पन्न होतात जेव्हा पोटाला लाभदायक ठरतात. जे पोटाच्या आरोग्यासाठी तसेच एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जेव्हा आतड्यांतील चांगले जीवाणू प्रोबायोटिक किंवा प्रोबायोटिक संयुगाचे चयापचय करतात तेव्हा ते तयार होतात. एका अभ्यासातून असे आढळले आहे की ते तुमच्या झोपेची गुणवत्ता पोस्टबायोटिक्समुळे सुधारते.

सिंबायोटिक्स-

सिंबायोटिक्स प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स यांचे एक मिश्रण आहे. जे पोटाचे आरोग्य चांगले होण्यासाठी एकत्र काम करतात. फाइब्रोमायल्जिया ( एक जुना आजार जो झोपेच्या समस्येला कारणीभूत ठरतो ) या आजाराने पीडित महिलांच्या संबंधित एका अभ्यासात सिंबायोटिक्स सप्लीमेंटेशन झोपेच्या कालावधी वाढण्यासाठी जुळलेला आहे. योगर्ट, वेगवेगळ्या पद्धतीचे चीझ, आईस्क्रीम, फर्मेंटेड स्कीम मिल्क आणि दही पासून बनवलेले पदार्थ हे सिंबायोटिक्स चांगले सोर्स आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.