नागपुरात १७ मार्चला आंदोलन केलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याचे समजते. पोलिसांनी यापूर्वीच हिंसाचारामागील मास्टरमाईंड असलेल्या फहीम खानसह ५१ जणांना अटक केली आहे. त्यापैकी २३ जणांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कल्पना चुंबळेंची वर्णीनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापदीपदी भाजप नेते शिवाजी चुंभळे यांच्या पत्नी कल्पना चुंभळे यांची वर्णी लागली आहे. देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर ही निवडणूक जाहीर झाली होती.
RSS कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही; टोचले विश्व हिंदू परिषदेचे काननागपूर दंगलीत झालेल्या हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विश्व हिंदू परिषदेचे कान टोचले आहे. संघ कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही, असे म्हणत कान टोचले आहेत.
पोलिसांनी प्रसिद्ध केला नागपूर दंगलीतील मास्टरमाईंडचा फोटोनागपूरची दंगल कोणी पेटवली या प्रश्नाचे उत्तर स्वतः पोलिसांनीच दिले आहे. या मास्टरमाईंडचा फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. फहीम खान असे या संशयिताचे नाव आहे. दंगल उसळण्यापूर्वीच काही वेळ आधी तो पोलीस स्टेशनमध्ये आला होता, अशी माहिती आहे.
नागपूरमधील दंगलीवर मध्यरात्री तीन वाजेपर्यंत सुनावणी, चार आरोपींना न्यायालयीन तर इतरांना पोलिस कोठडीनागपूर : नागपूरच्या न्यायपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) सुलताना मैमुना यांच्या न्यायालयात औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या हिंसाचारावर मंगळवारी रात्री तब्बल तीन वाजेपर्यंत सुनावणी घेण्यात आली. यात न्यायालयाने चार आरोपींना न्यायालयीन कोठडी तर उर्वरित आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Nagpur violence: पोलिसांचं मनोबल कमी होता कामा नये: योगेश कदमनागपूर दंगलीवर गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले आहे. नागपूरात जे काही घडलं, त्यावर सरकारची भूमिका काय? पोलिसांच मनोबल कसं वाढवणार? या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले आहे. नागपूर दंगलीत ज्या व्यक्तीनी पोलिसांना मारहाण केली, दगडफेक केली, त्यांना पोलिसांचा धाक काय असतो, हे 100 टक्के दाखवणार, असे योगेश कदम यांनी सांगितले. "कायदा हातात घेऊन अशी कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही. पोलिसांचं मनोबल कमी होता कामा नये. ही आमची जबाबदारी आहे," असे ते म्हणाले.
Nagpur violence:औरंग्याचे स्टेटस्; एकाला अटकराज्यात औरंगजेब हा सध्या वादाचा विषय असताना भंडाऱ्यातील एका तरुणाला औरंग्याचे स्टेटस् ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. त्याा भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत भंडाऱ्यातील हिंदू संघटनांनी पोलिसाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
Pune crime live: पुण्यात टेम्पोला भीषण आग; चौघांचा होरपळून मृत्यूपुण्यातील हिंजवडीत टेम्पो जळून खाक झाल्याने टेम्पोतील चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हे चारही जण कंपनीचे कर्मचारी होते. हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
देशमुख हत्या प्रकरणाच्या मास्टरमाईंडचा अद्यापही ठावठिकाणी नाहीदेशमुख हत्या प्रकरणाच्या मास्टरमाईंडचा अद्यापही ठावठिकाणी नाही Beed: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याला पकडण्यास पोलिसांना अपयश आले आहे. 98 दिवसांपासून त्याचा ठावठिकाणा नाही. कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याची चर्चा दोन दिवसापूर्वी होती.
Ajit Pawar NCP : 'एकाच घरात दोन आमदारकी देऊन काय फायदा?' राष्ट्रवादीत नाराजीराज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपने तीन, शिवसेना एक आणि अजित पवार गटाने एक उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एका विधानपरिषदेच्या जागेसाठी तब्बल ७५ हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते. तर झीशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील, अमरसिंह पंडित, आनंद परांजपे, सुरेश बिराजदार, दिपक मानकर, सुनील टिंगरे या महत्वाच्या स्थानिक नेत्यांनी विधानपरिषदेच्या जागेवर दावा ठोकला होता. मात्र अजित पवार यांनी संजय खोडके यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. यामुळे पक्षामधील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा सुरू असून एकाच घरात दोन आमदारकी देऊन काय फायदा? असा सवाल आता सर्व इच्छुक करताना दिसत आहेत.
Aaditya Thackeray : 'राज्यात द्वेष पसरवणारे हेच', स्वार्थासाठी'; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोलनागपुरात झालेल्या दंगलीनंतर विधीमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होती. त्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणाऱ्या राजकारणी ही कीड असून राज्यात हेच द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत. अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये, असे म्हटलं आहे.
Nitesh Rane News : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका, मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्तीनागपूर येथे झालेला हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन देताना स्पष्ट केलं आहे. पण हा हिंसाचार मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी नितेश राणे यांना शांत राहण्याचा सल्ला देत कान टोचल्याचे चर्चा सुरू आहे. अशातच त्यांनी, आपण मुख्यमंत्र्यांचे लाडके असून ते कशाला तंबी देतील? मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांची एक यादी आहे त्यामध्ये माझं नाव आहे. त्यामुळे कुणाला चिंता करण्याची गरज नाही, अशी स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
Nagpur Violence News : नागपूर हिंसाचारानंतर सांगली, मिरजेत तगडा बंदोबस्त; पोलीस यंत्रणा सतर्कऔरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर सांगली व मिरज शहरांमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून मिरजेत राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.
Nagpur Violence News : नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी कायमनागपूरच्या काही भागात सोमवारी (ता.19) रात्रीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली असून सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत लागू असणारी संचारबंदी उठवण्याचा नागपूर पोलिसांचा सध्या कोणताही विचार नाही. त्यामुळे ही संचारबंदी अनिश्चित कालासाठी लागू असणार आहे.
MPSC News : अखेर राज्यसेवा 2025 ची प्रतिक्षा संपली, 385 जागांसाठी जाहिरात आलीमागील दोन महिन्यांपासून राजपत्रित पूर्व परीक्षेच्या जाहिरातीची वाट पाहणाऱ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली असून 385 जागांसाठी जाहिरात काढली आहे.
Nagpur Violence News : नागपूरच्या हंसापुरी पुन्हा तणाव?नागपूरच्या हंसापुरी भागात सोमवारी (ता.17) रात्री हिंसाचार उसळल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण मंगळवारी (ता.18) रात्री 11 वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा काही काळ तणाव निर्माण झाला होता. संचारबंदी असताना एका इसमाने आपले दुकान उघडल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलीसांनी वेळीच हस्तेक्षेप करत गर्दीला पांगवाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.
Sunita Williams Return LIVE : अखेर 9 महिन्यानंतर सुनिता विल्यम्सचं पृथ्वीवर सुखरूप आगमनभारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानातून पृथ्वीवर सुखरूप परतले. बुधवारी (ता.19) भारतीय वेळेनुसार पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर किनारपट्टीवर त्यांच्या यानाचे स्प्लॅशडाउन झाले.