Prashant koratkar : कोर्टाचा दणका, प्रशांत कोरटकर फरार; पोलीस मुसक्या कधी आवळणार?
Saam TV March 20, 2025 07:45 AM

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर फरार झालाय.. त्यातच कोल्हापूर सत्र न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळून लावल्याने कोरटकरच्या अडचणी वाढल्यात.. मात्र तब्बल 22 दिवसानंतरही कोरटकरला अटक न केल्याने कोल्हेंनी हल्लाबोल केलाय.

25 फेब्रुवारीला प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिली. यावेळी कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.. त्यावरुन महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली..

त्यामुळे कोरटकरला पोलीस संरक्षण देण्यात आलं...त्यानंतरही कोरटकरने पोलीसांच्या हातावर तुरी देऊन धूम ठोकली... एवढंच नाही तर कोरटकरने कोल्हापूर न्यायालयातून जामीन मिळवला.. त्यानंतर सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली.. तर न्यायालयाने पुन्हा कोरटकरच्या जामीनाचा चेंडू कोल्हापूर न्यायालयाकडे टोलवला.. त्यानंतर 18 मार्चला कोरटकरचा जामीन फेटाळण्यात आला.

त्यामुळे पोलीस कोरटकरच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूरच्या दिशेने निघालेत...मात्र भेदरलेला कोरटकर कोणत्या बिळात लपून बसलाय? याबरोबरच पोलीस बंदोबस्त असतानाही कोरटकर पसार कसा झाला? कोरटकर फरार होत असताना पोलीस आंधळे झाले होते का? फरार असतानाही कोरटकरने मोबाईल पत्नीपर्यंत कसा पोहचवला? ? कोरटकरला पोलीसांचंच अभय आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत... त्यामुळे प्रश्न पोलीसांच्या कार्यक्षमतेचा आणि इभ्रतीचा असल्याने कोरटकरच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार? याकडे लक्ष लागलंय...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.