Disha Salian Death Case : 'माझ्या मुलीची हत्याच' दिशाच्या आई-वडिलांचा याचिकेत गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
Saam TV March 20, 2025 07:45 AM

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.. दिशा सालियनची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप करत दिशा सालियनच्या आई वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय.. तर या याचिकेत आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सुरज पांचाल यांचा उल्लेख करत गंभीर आरोप करण्यात आलाय... त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ झालीय. मात्र या याचिकेत नेमकं काय म्हटलंय? पाहूयात....

सालियन कुटुंबियांच्या याचिकेत काय?

8 जून 2020 रोजी मालाडच्या घरी पार्टी

पार्टी सुरु असताना ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोरियाची अनपेक्षितपणे एण्ट्री

दिशाचा सामुहिक बलात्कार

प्रकरण दाबण्यासाठी दिशाची हत्या

पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून शरीरावरील जखमांचा उल्लेख वगळण्यात आला

फोरेन्सिक पुरावे नष्ट करण्यासाठी घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आले

प्रकरण दाबण्यासाठी आदित्य ठाकरेंचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेकदा फोन

किशोरी पेडणेकरांनी आमची दिशाभूल करुन नजरकैदेत ठेवलं

तर दिशा सालियनचे वडील सतिश सालियनच्या वकिलांनी या प्रकरणात आणखीच धक्कादायक आऱोप केले आहेत. तर किशोरी पेडणेकरांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या मोबाईल लोकेशनसह सखोल चौकशीची मागणी केलीय..

8 जून 2020 मध्ये दिशा सालियनचा मालाडमधील गॅलक्सी रीजेंटच्या 14 व्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू झाल्याचं म्हटलं जात होतं.. मात्र दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरुन नारायण राणे आणि नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले होते.. तर सरकारने दिशा सालियन प्रकऱणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केलीय...मात्र आता थेट दिशा सालियनच्या आई आणि वडिलांनीच याचिका दाखल केल्याने आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.