नवीन नियम 1 एप्रिल: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2025-26 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी आयकरात मोठा सवलत तसेच अनेक नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती. आता हे नियम आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून लागू होत आहेत. या बदलामध्ये कर वजावट (TDS) आणि स्रोतावरील कर संकलन (TCS) साठी नवीन नियम देखील समाविष्ट आहेत. जाणून घेऊयात याबाबतच सविस्तर माहिती.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस कपात दुप्पट करण्याची घोषणा केली होती. पूर्वी ते 50 हजार रुपये होते, ते आता 1 लाख रुपये झाले आहे. त्यामुळे त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर जमीनदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. खरेतर, भाड्याच्या उत्पन्नावरील टीडीएस कपातीची मर्यादा प्रति आर्थिक वर्ष 2.4 लाख रुपयांवरून प्रति आर्थिक वर्ष 6 लाख रुपये करण्यात आली आहे.
परदेशातून व्यवहार करणाऱ्या लोकांसाठी आरबीआयच्या उदारीकृत रेमिटन्स योजनेसाठी टीसीएस कपातीची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. यापूर्वी परदेशातून 7 लाख रुपयांच्या व्यवहारांवर TCS वजा केले जात होते, ते 10 लाख रुपये करण्यात आले आहे.
विशिष्ट वित्तीय संस्थेकडून शैक्षणिक कर्जावरील TCS काढून टाकण्यात आली आहे. यापूर्वी, 7 लाखांपेक्षा जास्त शैक्षणिक कर्जावर 0.5 टक्के TCS वजा केले जात होते, तर 7 लाखांपेक्षा जास्त शैक्षणिक व्यवहारांवर 5 टक्के TCS कापले जात होते.
लाभांश उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे, तर म्युच्युअल फंडांच्या युनिट्सवर मिळणाऱ्या उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा देखील प्रत्येक आर्थिक वर्षात 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे. याशिवाय टीडीएस देखील प्रति बक्षीस 10,000 रुपये करण्यात आला आहे.
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींचे पुनरावलोकन करतात, त्यामुळे तुम्हाला 1 एप्रिलच्या पहाटे सिलिंडरच्या किमतीत बदल दिसू शकतात.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, तेल कंपन्या हवाई इंधनाच्या किंमतींमध्ये काही बदल करतात, म्हणजे एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..