Susheela-Sujeet Movie: सुशीला - सुजीत मध्ये एक, दोन नव्हे; तर तब्बल 'इतक्या' भूमिका निभावणार प्रसाद ओक!
Saam TV March 20, 2025 09:45 PM

Susheela-Sujeet Movie: एखादा कलाकार एखाद्या चित्रपटात फार फार तर दुहेरी भूमिका साकारताना दिसतो पण आगामी सुशीला - सुजीत या चित्रपटा मध्ये प्रसाद ओक एक दोन नव्हे तर तब्बल पाच भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रसाद ओक या चित्रपटाचं दिग्दर्शन तर करणार आहे पण सोबतीने बाकी काही खास भूमिका देखील निभावताना दिसणार आहे.

आजवर प्रसाद ने मराठी चित्रपट सृष्टीला अनेक सुपरहिट दमदार चित्रपट तर दिले आहेत… पण आगामी सुशीला - सुजीत ची प्रेक्षकांना अधिक उत्सुकता आहे. "" चित्रपटात प्रसाद करत असलेल्या तब्बल पाच भूमिका नक्की कोणत्या ? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.. तर या चित्रपटाचा कॅप्टन ऑफ द शीप म्हणजे दिग्दर्शक आहे. सोबतीला तो या चित्रपटात एक अतरंगी भूमिका साकारतोय ! चित्रपटाची कथा प्रसादचीच आहे. या चित्रपटाचा प्रसाद निर्माता सुद्धा आहे आणि लास्ट बट नॉट लिस्ट या चित्रपटात प्रसादनी एक सुंदर गाणं देखील गायलं आहे.

एवढ्या सगळ्या भूमिका आणि त्या सुद्धा एकाच चित्रपटासाठी निभावणं ही खरंतर तारेवरची कसरत म्हणावी पण प्रसाद नी या सगळ्या भूमिका एकदम चोख पार पाडल्या आहेत. ज्या तुम्हा सगळ्यांना येत्या 18 एप्रिल ला सिनेमा गृहात बघायला मिळतील.

प्रसाद प्रत्येक सिनेमात काही न काही तरी वेगळा प्रयत्न करून प्रेक्षकांना मोहित करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळेच आता प्रेक्षकांना सुशीला - सुजीत मध्ये काय वेगळं बघायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे. एकाच चित्रपटात या अशा ५ भूमिका निभावणारा प्रसाद हा खरोखरच मराठीतला एक हरहुन्नरी कलाकार आहे असं म्हणणं नक्कीच वावगं ठरणार नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.