राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि साताऱ्यातील भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी या महिलेला अटक केली. प्रकरण मिटवण्यासाठी महिलेने ३ कोटींची मागणी केली होती. त्यामधील १ कोटी रुपयांची रक्कम घेताना महिलाला रंगेहात पोलिसांनी अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.