झी मराठीवरील 'पारु' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेतील पारुला प्रेक्षकांना भरभरुन प्रेम मिळत आहे. दरम्यान किर्लोस्कर कंपनीच्या लोगोवर असलेले डोळे नेमके कोणाचे याचा शोध आदित्यकडून घेतला जात आहे. याचवेळी पारुला ते डोळे स्वत: चे असल्याची समजलं आहे. त्यामुळे पारु आता आदित्यला खरं सत्य सांगते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मालिकेमध्ये पारुने आदित्य आणि आहिल्यादेवीला वाचवत अनुष्काचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे. त्यामुळे आहिल्यादेवीच्या मनात पारुने एक वेगळं स्नान मिळवलं आहे. आता पारुला आदित्यचं प्रेम जिंकायचं आहे. त्यासाठी ती काही करायला तयार आहे. पारु आणि आदित्य याच्या जीवनशैलीत प्रचंड फरक असल्यानं किर्लोस्कर कुटुंब पारुला सून म्हणून स्वीकारते की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पारु आदित्यला खरं सांगण्याचा प्रयत्न करत असते. परंतु पारुचा आंतर्मन त्याला विरोध करत असतं. दोघांची बरोबरी होऊ शकत नाही असं आंतर्मन नेहमी तिला सतत सांगत असतं. त्यामुळे पारु आता आदित्यला सत्य सांगते की डोळ्याचं गुपीत अजूनही कायम राहणार हे पाहावं लागणार आहे.
एकीकडे आदित्य कोणत्या मुलीचे डोळे असावेत याचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे पारु आदित्यला डोळ्याचं कळाल्याचं मैत्री तुटेल याची भिती मनात घेऊन बसली आहे. त्यामुळे पारुच्या मनातील चलबिचल पारुला सत्य सांगू देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.