rat21p3.jpg-
52607
चिपळूणः मुर्तीकार संदीप लवेकर यांनी घडविलेली कोंडफणसवणेतील चांदीची पालखी.
------------
संदीप लवेकर यांनी घडविल्या
देवीच्या नवीन चांदीच्या मूर्ती
चिपळूण, ता. २१ः कोकण म्हटले की शिमगा व त्यात नाचवल्या जाणाऱ्या ग्रामदेवतांच्या पालख्यांचे आकर्षण असते. गेल्या तीन पिढ्यापासुन पालखीमधील चांदीच्या मूर्ती घडविण्याचे काम लवेकर घराणे करत आहे. घनश्याम भास्कर लवेकर यांनी सुरु केलेली ही परंपरा पुढे सुरू ठेवणारे संदीप लवेकर हे आता कोकणात प्रसिद्ध आहेत.
चिपळूणमधील मानाचा शिमगोत्सव म्हणजे मिरजोळीच्या महालक्ष्मी साळुबाई देवस्थानचा शिमगा होय. या शिंमगोत्सवासाठी संदीप लवेकर यांनी महालक्ष्मी देवी व साळुबाई देवीच्या नवीन चांदीच्या मूर्ती घडविल्या आहेत. नुकताच या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना सोहोळा थाटामाटात मिरजोळी येथील देवस्थानमध्ये करण्यात आला.
चिपळूणमधील परकार कॉम्लेक्ससमोरील लवेकर यांच्या दुकानात मूर्ती, देव्हाऱ्यातील टाक, मुखवटे, कळस, प्रभावळ, मुकुट, पालखी घडविण्याचे काम वर्षभर सुरू असते. आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरामधील आकर्षक अशी प्रभावळ त्यांच्या कलाकुशलतेचा अदभुत नमूना आहे. कोकणातील अनेक देवस्थानची कामे त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे कोकणातून अनेक देवस्थानचे लोक त्यांच्या दुकानाला भेट देत असतात.