परंडा : अनेक महिन्यांपासून तालुका परिसरात धुमाकूळ घालत दहशत निर्माण करणारा व वन विभागाला चकवा देणारा बिबट्या गुरुवारी (ता.२०) मध्यरात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला तालुका परिसरातील विविध ठिकाणी अनेक पशुधनावर हल्ला करून त्यांना ठार केले होते. त्यामुळे बिबट्याची दहशत निर्माण झाली होती.
बुधवारी (ता.१९) कपीलापुरी येथे भरदिवसा मसगुडे यांच्या शेळीवर हल्ला केला होता तर रात्री वर्धमान जैन यांच्या रेडीवर हल्ला करून रेडीला ठार मारले होते, बिबट्या दोन दिवसा पासुन कपीलापुरी शिवारात हल्ले करीत असल्याने वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता, मात्र लावलेल्या पिंजऱ्याची गज तुटल्याने पिंजऱ्यातील बोकड घेऊन बिबटया पळाला होता.
त्यानंतर कपीलापुरीच्या ग्रामस्थांनी पिंजऱ्याला ला वेंल्डींग करून दुरुस्ती केल्या नंतर वन विभागाच्या वतीने दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. २० ) पुन्हा पिंजरा लावण्यात आला होता. तेथेशिकारी साठी आलेला बिबटया गुरूवार रात्री आकारा वाजण्याच्या सुमारास पिंजऱ्यात अडकता बिबटया पकडला गेल्याने शेतकत्यांनी प्रकडण्यासाठी झटणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.