Sairat Re- Re-released: ९ वर्षांनी 'सैराट' प्रेक्षकांच्या भेटीला; परश्या म्हणाला,'आमच्यासाठी स्वप्नगत...'
Saam TV March 21, 2025 11:45 PM

Sairat Re- Re-released: नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचला आहे. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांना वेड लावले. 'सैराट' या चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रेमकथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता. तसेच अजय -अतुल यांच्या उत्कृष्ट संगीतानेही या चित्रपटाच्या लोकप्रियतेला हातभार लावला.

या अभूतपूर्व यशानंतर '' आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट आज म्हणजेच २१ मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता 'सैराट'च्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

या चित्रपटाच्या आठवणींना उचला देताना सैराट फेम अभिनेता ने एक खास पोस्टसोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये आकाशने लिहिले, सैराट!!! पिक्चर शूट करतानाचा पूर्ण प्रवासच आमच्यासाठी स्वप्नगत होता, आणि पिक्चर रिलीज झाल्यानंतरचा हा 9 वर्षांचं प्रवास तुम्ही बघतच आलाय. 9 वर्षांनी आज सैराट परत रिलीज होतोय याचा आम्हाला खरच खुप आनंद होत आहे. परत मोठ्या पडद्यावर आर्ची-परश्या म्हणून तुम्हाला भेटायला येतोय.

आकाश पुढे म्हणाला, हे शक्य झाल ते फक्त नागराज आण्णामुळे! सैराटमुळे आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, आणि त्याबद्दल मी आण्णांचा कायम ऋणी राहीन. आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठी धन्यवाद ! तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन परत “सैराटमय” व्हायला विसरू नका !!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.