Latest Marathi News Updates : बस कंडक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज कन्नड संघटनांकडून कर्नाटक बंदची हाक
esakal March 22, 2025 12:45 PM
Karnataka Bandh : बस कंडक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज कन्नड संघटनांकडून कर्नाटक बंदची हाक

बेळगाव येथे मराठी न बोलल्याबद्दल बस कंडक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अनेक कन्नड संघटनांनी राज्यात सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंदची हाक दिली आहे. यादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Pune Municipal Corporation LIVE : पाण्याचा अधिक वापर केल्यास सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडणार; ⁠पुणे महापालिकेचा नागरिकांना इशारा

पाण्याचा अधिक वापर केल्यास सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडणार, असा इशारा ⁠पुणे महापालिकेने नागरिकांना दिला आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून शहरात समान पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पालिकेकडून शहरातील पाणीपुरवठ्याचे १४१ झोन तयार करण्यात आले आहेत. त्यातील ४७ झोन तयार झाले आहेत. तर, ४१ झोनमध्ये मीटरद्वारे मुख्य टाकीतून सोडण्यात आलेले पाणी, सोसायटीच्या टाकीत पडलेले पाणी याची मोजणी केली जात आहे. त्यानुसार, प्रती व्यक्ती १३५ लीटरप्रमाणे सोसायटीने पाणी घेणे आवश्यक आहे. मात्र, काही सोसायट्यांचा पाणी वापर ५०० ते ६०० लीटर पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

Bangalore Police : हॉटेल पुरवठादाराच्या बॅगेत सापडला हातबॉम्ब

बंगळूर : येथील वैभव हॉटेलच्या (Vaibhav Hotel) पुरवठादाराच्या बॅगेत हातबॉम्ब सापडला. यामुळे घाबरून हॉटेल कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना (Bangalore Police) कळवले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली. हातबॉम्ब (ग्रेनेड) आणि हॉटेल पुरवठादार अब्दुल रहमान याला ताब्यात घेतले आणि सखोल चौकशी केली.

Kolhapur News : पालकमंत्री आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आज (ता. २२) पासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.पालकमंत्री आबिटकर यांचे आज सकाळी सात वाजता शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन होईल. मोटारीने शासकीय विश्रामगृह येथे जातील. सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथून मोटारीने वाळवा (जि. सांगली) कडे प्रयाण होईल. सायंकाळी सहा वाजता यशोलक्ष्मी मंगल कार्यालय, इचलकरंजी येथे ए. आर. तांबे यांच्या एकसष्टी अभीष्टचिंतन सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील. मंत्री हसन मुश्रीफ उद्या (ता. २२) सकाळी ७.२० वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेसने आगमन, तेथून कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी आठ वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी ११ वाजता गडहिंग्लज येथे एचपीव्ही लसीकरणसंदर्भात आढावा बैठक.

Shiravane MIDC Fire : शिरवणे MIDC परिसरात आग विझवण्याचे काम अद्याप सुरूच

शिरवणे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरात आग विझवण्याचे काम अद्याप सुरूच आहे. काल रात्री 11 वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे.

Buddhist Dhamma Parishad LIVE : महाबोधी महाविहार मुक्तीसाठी रविवारी बौद्ध धम्म परिषद, रॅली

सांगली : ‘‘बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क’तर्फे वामन मेश्राम यांच्या निर्देशानुसार महाबोधी विहार मुक्ती आंदोलन उभारण्यात आले आहे. याच मोहिमेअंतर्गत बौद्धधर्म कार्य समन्वय समितीतर्फे रविवारी (ता. २३) बौद्ध धम्म परिषद आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे,’’ अशी माहिती संयोजक सुजाता पवार, सचिन कांबळे, संतोष आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान परिषद होणार आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून बंदी आदेश जारी, काय आहे कारण?

कोल्हापूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २२ मार्च सकाळी सहा वाजल्यापासून ते तीन एप्रिलच्या रात्री बारापर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी हे आदेश दिले आहे. जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहे. विविध पक्षांकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

BJP MLA LIVE : कर्नाटक विधिमंडळात गदारोळ; भाजपचे १८ आमदार निलंबित

बंगळूर : कागदपत्रे फाडून फेकून देत कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांचा अनादर केल्याबद्दल अध्यक्ष यू. टी. खादर यांनी भाजपच्या १८ आमदारांना पुढील सहा महिन्यांसाठी शुक्रवारी निलंबित केले. विधानसभेत आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान, गोंधळातच राज्याचा अर्थसंकल्प आणि आमदारांचे वेतन वाढविण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला.

Judge Yashwant Verma Live : न्यायाधीश यशवंत वर्मांच्या दिल्लीतील निवासस्थानी सापडले पंधरा कोटी रुपयांचे घबाड

Latest Marathi Live Updates 22 March 2025 : कागदपत्रे फाडून फेकून देत कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांचा अनादर केल्याबद्दल अध्यक्ष यू. टी. खादर यांनी भाजपच्या १८ आमदारांना पुढील सहा महिन्यांसाठी निलंबित केले. तर, सरकारी कंत्राटी कामांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करण्यात आले. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सापडलेल्या कथित पंधरा कोटी रुपयांच्या घबाडावरून आता संशयाचा धूर निर्माण झाला आहे. ‘कुठल्याही क्रांतीची सुरुवात ही संघर्षातूनच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या माणगावच्या ऐतिहासिक परिषदेपासूनच देशात सामाजिक क्रांतीला सुरुवात झाली’, असे मत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करू नका, अशी मागणी ब्लॅक पँथर पक्षाच्या शिष्टमंडळाने आज केली. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात आता बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.