बांगलादेशातील आंदोलनासंदर्भात धक्कादायक तथ्य बाहेर आले आहे. या आंदोलनाची विदेशातील लिंक समोर आली आहे. विदेशी फंडींग आंदोलनासाठी आल्याचे तथ्य समोर आले आहे. या फंडींगमधून नेत्यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे. या सर्व प्रकरणात मनी लॉन्ड्रींग झाल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. जातीय नागरिक कमेटीचे संस्थापक आणि एडीएसएमचे नेते सरजिस आलम यांनी 7.65 मिलियन डॉलर (65 कोटी रुपये) क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवले आहे.
सरजिस आलम हे साधारण परिवारातील आहे. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवली आहे. हा प्रकार अवैध विदेशी फंडींगचा असल्याचे दिसत आहे. अंतरिम सरकारचे आयटी सल्लागार आणि एडीएसएम कोऑर्डिनेटर नाहिद इस्लाम यांनी 204.64 बिटकॉइन (BTC) घेतले आहे. त्याची किंमत 17.14 मिलियन डॉलर (147 कोटी रुपये) आहे. या गुंतवणुकीसाठी पैसे कुठून आले? हा प्रश्न समोर आला आहे.
सीटीजी विद्यापीठाशी संबंधित एडीएसएम लीडर खान तलत महमूद रफी यांनीही 11.094 बिटकॉइन गुंतवणूक केली आहे. त्याची किंमत 1 मिलियन डॉलर (8.60 कोटी रुपये) आहे. ते सुद्धा संपन्न परिवारातील नाही. यामुळे या सर्व प्रकरणात मनी लॉन्ड्रींगची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंतरिम सरकारचे प्रेस सचिव आणि पत्रकार शफीकुल आलम यांच्याकडे 93.06 बिटकॉइन आहेत. त्याची किंमत 10 मिलियन डॉलर म्हणजे 86 कोटी रुपये आहे. यामुळे आंदोलनाशी संबंधित लोकांना विदेशातून फंडींग मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. बांगलादेशातील जे आंदोलन नेतृत्व बदलाच्या मागणीसाठी होते ते आंदोलन विदेशी फंडींगमधून उभारले गेल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी आरक्षणाविरोधात आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला. त्यांचे सरकार पाडल्यानंतर हळूहळू आंदोलन थांबले. आता बांगलादेशाची सूत्र अंतरिम सरकारच्या हाती आहेत. दरम्यानच्या काळात निवडणुका होतील आणि नवे लोकशाही सरकार येईल, अशी अपेक्षा होती मात्र अद्याप तसे झालेले नाही. ज्या विद्यार्थ्यांना सरकार पाडायचे होते त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला आहे.