पोलिसांसमोर पीडित मुलीने अत्याचाराचा पाढाच वाचला. अक्षरशः नराधमाचे कृत्य ऐकून डोळ्यांमध्ये अश्रू व बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
उमदी : जत पूर्व भागातील एका गावात अत्यंत घृणास्पद आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. तेरा वर्षांच्या लेकीवर बापानेच अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. संशयितावर बालिकेचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत () रात्री उशिरा उमदी पोलिसांत (Umadi Police) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित नराधमास गजाआड केले.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पूर्व भागातील एका गावात तेरा वर्षीय मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत गेली चार महिने तिच्यावर अत्याचार सुरू होता. हे मुलीच्या आईच्या लक्षात आले होते. याबाबत पतीला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो ऐकत नव्हता. अखेरीस काल सकाळी महिला अंमलदार यांना याबाबतची माहिती दिली.
त्यानंतर सार प्रकार समोर आला. पोलिसांनी संबंधित नराधम बापास अटक केली आहे. पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीसह आईचा जबाब नोंदवला आहे. अत्याचारीत पीडित मुलीने अत्याचाराचा पाढाच वाचला. अक्षरशः नराधमाचे कृत्य ऐकून डोळ्यांमध्ये अश्रू व बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच नराधमाने कबुली दिली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद सुरू होती.