पुणे शहर,पिंपरी-चिंचवड तसेच पुणे जिल्हा शाखांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या तसेच पक्षाच्या आजीमाजी लोकप्रतिनिधींच्या ते काँग्रेसभवनमध्ये बैठका घेणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच पुणे दौरा असून त्यामुळेच त्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा मागील जवळपास तीन पंचवार्षिक सलग पराभव होतो आहे.
पुणे शहर व जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ काँग्रेसकडे नाही. तीन आमदार होते, मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचाही पराभव झाला.
काँग्रेसचा एकही आमदार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाच मागील ३ वर्षे झालेल्या नाहीत.त्यामुळे तिथेही पक्षाचा कोणीही नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य नाही.
एकूणच राजकीय दृष्ट्या जिल्ह्यात काँग्रेसला सध्या तरी एकही लोकनियुक्त म्हणजे निवडून आलेला लोकप्रतिनिधी नाही.
ST Bus: धाराशिवच्या उमरगा येथून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या एसटी बस बंदउमरगा बसस्थानकातून कलबुर्गी मार्गावर जाणाऱ्या विविध आगाराची बस वाहतूक बंद
आज कर्नाटकातील विविध कन्नड संघटनांनी कर्नाटक बंदची हाक दिली असून,या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये वाहतूक करणारी बससेवा करण्यात आली बंद
महाराष्ट्रातील जालना,छत्रपती संभाजी नगर व लातूर अदी आगाराच्या एस.टी बस धावतात उमरगा कलबुर्गी या मार्गावर
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालावी
सर्वत्र कन्नड भाषेला प्राधान्य द्यावे, म्हादई योजनेची अंमलबजावणी त्वरित करावी,
अशा विविध मागण्यांसाठी आज कर्नाटकमध्ये पुकारण्यात आला आहे बंद
Pandharpur: पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमणशनिवारी व रविवारी सलग सुट्यांमुळे त्यातच दहावी बारावीच्या परिक्षा संपल्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे.
अशातच मंदिर परिसरात फेरीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने मांडली आहेत.
यांचा भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. या शिवाय मंदिराच्या प्रवेशद्वारातच दुकाने मांडण्यात आल्याने मंदिराची सुरक्षा धोक्यात आली आहे.
येथील वाढत्या अतिक्रमणामुळे मंदिर परिसरात नवीन समस्या निर्माण झाली आहे.
याकडे पोलिस मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसले ला आज चकलांबा पोलीस गेवराई न्यायालयात हजर करणारसतीश उर्फ खोक्या भोसले च्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये चार गुन्हे दाखल आहेत तर चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये बॅटच्या साह्याने अमानुष मारहाण प्रकरणी एक गुन्हा दाखल आहे बावी येथील ढाकणे पिता पुत्रांना अमानुष मारहाण प्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसले ला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती ती पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे यानंतर न्यायालयीन कोठडी मदन त्याला चकलांबा पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेऊन त्याला आज गेवराईच्या तालुका न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे पुन्हा सतीश उर्फ खोक्या भोसले ची पोलीस कोठडी मागणार आहेत. अशी माहिती तर पैसे अधिकारी यांनी दिली आहे.
Maharashtra Politics: विधानपरिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांचे अमरावतीमध्ये जल्लोषात स्वागतआमदार झाल्यानंतर अमरावती शहरात प्रथम आगमनानिमित्य कार्यकर्त्यांनी अमरावती रेल्वे स्टेशन वर स्वागतासाठी केली मोठी गर्दी
ढोल ताशे, फटाक्याच्या आतषबाजीत आमदार संजय खोडके यांचे अमरावती मध्ये स्वागत
आ. सुलभा खोडके, आणि आ.संजय खोडके दोन्ही पती पत्नी अमरावती मध्ये आमदार झाल्याने अमरावतीकरणा विकासाचा मोठ्या अशा...
अमरावती च्या व विदर्भाच्या विकासासाठी,मी प्रयत्नशील राहील..अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने जो माझ्यावर विस्वास् टाकला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो..
विदर्भाच्या विकासाच जे धोरण आमच्या पार्टीने ठरविलं आहे,ते विदर्भाच्या विकासासाठी कसोटीने पर्यन्त करू अशी प्रतिक्रिया आ.संजय खोडके यांनी दिली
माथेरानमध्ये मोटार वाहनांना नो एन्ट्री कायम , सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान दिला निर्णयपर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये कुठल्याही परीस्थितीत मोटार वाहनांसाठी खुले होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
माणसांनी ओढल्या जाणाऱ्या हातरिक्षा या मानवी हक्कांचे उल्लंघन करतात.
माथेरानमध्ये तूर्तास ई रिक्षांची संख्या वाढवली जाणार नसून त्यासाठी सरकारने फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
माथेरामधील विविध प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात सलग चार दिवस सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने आपली भूमिका मांडली.
माथेरानमध्ये पेव्हर ब्लॉक टाकण्यासंदर्भात नीरीकडून अहवाल मागवण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याची ठाकरे गटाची मागणीलाडक्या बहिणींना दरमहा 2100 रूपये देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
धाराशिवच्या भूम उपविभागीय अधिकाऱ्यांना ठाकरे गटाकडून निवेदन देत ही मागणी करण्यात आलीय.
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर निवडणूक जाहीर नाम्यात 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
ते द्यावे अशी आठवण निवेदनाद्वारे करून देण्यात आलीय.
Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 300 कोटीची उलाढालयावर्षीच्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढण्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
यातूनच विक्रेत्यांनी 24 लाख पॅकेट्सची नोंदणी केली आहे.
207 कोटी रुपयांचे कापसाचे बियाणे जिल्ह्याला लागणार आहे यासोबतच सोयाबीन, तूर, मुंग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका या विविध पिकांच्या बियाण्यासह खताची तीनशे कोटीची उलाढाल जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे.
Navi Mumbai: नवी मुंबईतील शिरवणे एमआईडीसी मध्ये लागली भीषण आगशिरवणे एमआईडीसी मधील सुबोधा कंपनीमध्ये लागली आग
रात्रीच्या सुमारास लागली आग
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी झाल्ल्या असून त्यांच्या रात्रभर करण्यात आलेल्या प्रयत्नाने पहाटे आगीवर नियंत्रण.
सुदैवाने जीवितहानी नाही.
Yavatmal: राळेगावात मध्यरात्री चार दुकाने जळून खाक, आगीने झाले मोठे नुकसानरात्री एक वाजता दरम्यान मार्केट मध्ये भीषण आग,आगीत चार दुकाने जळून खाक
आगीत पन्नास लाख रूपयाचे साहित्य जळून खाक,राळेगाव पालिकेची अग्निशामक यंत्रणा ठरली फेल,त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
आग लागण्याचे कारण अस्पष्ट,आगीत साडी सेंटर,इलेक्ट्रॉनिक,फर्निचर ही दुकाने जळून खाक
Raigad Politics: रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत० महाडच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर
० राष्ट्रवादी प्रवेशाची प्राथमिक चर्चा पूर्ण
० आज सुतारवाडीत सुनील तटकरेंसोबत अंतिम चर्चा
० हनुमंत जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार
० स्नेहल जगताप बैठकीला अनुपस्थित राहणार
० भरत गोगावले यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांची खेळी ?