हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ यंदा नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. या संघात अनेक धडाकेबाज फलंदाज आहेत.
मुंबई इंडियन्ससाठी आजवर सर्वाधिक षटकार मारणारे पाच खेळाडू कोणते, याची माहिती घेऊ.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या ईशान किशनने मुंबईसाठी ८४ डावांत १०६ षटकार खेचले आहेत. पण यंदा तो मुंबईकडून खेळणार नाही.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आतापर्यंत ९८ डावांत १०९ षटकार खेचले आहेत.
'मिस्टर ३६०' अशी ओळख निर्माण केलेल्या धडाकेबाज सूर्यकुमार यादवने ९६ डावांत ११० षटकार मारले आहेत.
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने तर षटकारांचे द्विशतक केले आहे. त्याने २१७ डावांमध्ये २४५ षटकारांचा पाऊस पाडला आहे.
मुंबई इंडियन्सचा 'फिनिशर' म्हणून ओळख असलेल्या किएरॉन पोलार्डने १९३ डावांत २५८ षटकार खेचत या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पहिलाच सामना बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध २३ मार्च रोजी होणार आहे.