IPL 2025 : केकेआरमध्ये अखेरच्या क्षणी या गोलंदाजाची एन्ट्री! टीमकडून माहिती
GH News March 22, 2025 09:11 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) सलामीच्या सामन्यासाठी फक्त काही मिनिटं बाकी आहेत. या हंगामातील सलामीच्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आमनेसामने आहेत. हा सामना ऐतिहासिक ईडन गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही संघांनी सलामीच्या सामन्यासाठी जोरदार सराव केला आहे. आता रंगारंग कार्यक्रमानंतर सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी केकेआरच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. केकेआरमध्ये अखेरच्या क्षणी एका बॉलरची एन्ट्री झाली आहे, अशी माहिती सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे.

केकेआरने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओत स्फोटक फलंदाज आणि फिनिशर रिंकु सिंह हा बॉलिंग करतोय. तसेच दुसऱ्या बाजूला या व्हीडिओत फिरकीपटू मोईन अली दिसतोय. रिंकु या व्हीडिओमध्ये फिरकी बॉलिंगचा सराव करतोय. “आम्ही टीममध्ये आणखी एक गोलंदाज जोडला आहे”, केकेआरने अशा कॅप्शनसह हा व्हीडिओ पोस्ट केला आहे.

रिंकूची छप्परफाड कमाई

केकेआरने रिंकूला मेगा ऑक्शन 2025 आधी रिटेन केलं. केकेआरने रिंकुला आपल्यासोबत कायम ठेवण्यासाठी तब्बल 13 कोटी रुपये मोजले आहेत. केकेआरने रिंकूला 2018 साली 55 लाख रुपयांत आपल्या टीममध्ये घेतलं. रिंकूला तेव्हापासून प्रत्येक मोसमासाठी 55 लाख रुपये मिळत होते. मात्र यंदा मेगा ऑक्शनआधी केकेआरने रिंकूसाठी 13 कोटी मोजून रिटेन केलं.

रिंकु सिंह याची आयपीएल कारकीर्द

रिंकु सिंह याने 2018 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून या 27 वर्षीय फलंदाजाने 45 सामन्यांमध्ये 143.34 च्या स्ट्राईक रेटने आणि 30.79 च्या सरासरीने 893 धावा केल्या आहेत. रिंकूने या दरम्यान 4 अर्धशतकं झळकावली आहेत.

रिंकू सिंहचा बॉलिंगचा सराव

आयपीएल 18 व्या मोसमासाठी केकेआर टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, रहमानउल्लाह गुरबाज, मनीष पांडे, मोईन अली, एनरिच नॉर्खिया, रोवमॅन पॉवेल, अनुकूल रॉय, मयंक मार्कंडे, चेतन साकारिया आणि लवनीथ सिसोदिया.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.