कोरटकर सरकारचा सोयरा, म्हणून तो सापडत नाही – मनोज जरांगे पाटील
Marathi March 23, 2025 12:24 AM

प्रशांत कोरटकर हा सरकारचा सोयरा आहे, म्हणूनच तो सापडत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत. इतर कोणी असतं तर कारण नसतानाही तुरुंगात टाकलं गेलं असतं, असा निशाणा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर साधला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, “प्रशांत कोरटकर सरकारचा सोयरा आहे, म्हणून सापडणार नाही. इतर कोणी असतं तर, नसतं काही तरी त्याला तुरुंगात टाकलं असतं. कोरटकरवर देशद्रोहाचा, मकोका आणि इतर जितके कलम आहे, तितके त्यावर टाकायला हवेत. फक्त निषेध करून चालणार नाही. आता छत्रपती शिवराय आणि महापुरुषांनावर बोलणाऱ्यांना धडा शिवायला हवा.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.