महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज मुंबईत आढावा बैठक आहे. मनसेच प्रमुख राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
CM Devendra Fadnavis News : त्र्यंबकेश्वराचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता.23) नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी त्र्यंबकेश्वरलाही भेट दिली. यावेळी त्यांनी भगवे सोवळं परिधान करत त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. येथील आद्यपीठ त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
Nanded Congress News : नांदेडमध्ये काँग्रेससह अशोक चव्हाणांना मोठा धक्कानांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत दुपारी नांदेडमध्ये हा पक्षप्रवेश होणार असून अशोक चव्हाणांना हा धक्का मानला जातोय.
Nagpur Violence News : नागपुरमधील संचारबंदीत शिथिलताछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये असलेल्या औरंगजेबच्या कबरीवरून नागपूरमध्ये वाद झाला. या वादाचे हिंसाचारात रूपांतर झाल्याने शहरात काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती आता शिथील करण्यात आली आहे. यामुळे येथे जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. पाचपावली, शांतीनगर, लकडगंजमधील संचारबंदी पूर्णता: उठवण्यात आली आहे. तर कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत संध्याकाळी सात ते रात्री दहापर्यंत शिथिलता देण्यात आलीय. तर यशोधरानगरमधील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे.
Aurangzeb Tomb News : औरंग्याची कबरीला टाळे लावण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलेछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये औरंगजेबचे कबर असून नागपूरमध्ये या कबरीवरून दंगल उसळी. यावरून आता औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. तर गनिमी काव्याने टाळे ठोकणारच असा इशारा संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाने दिला आहे.
Shivsena News : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आज मुंबईत बैठकउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक आज (ता. 23) मुंबईत होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर मुंबई उपनगर संपर्कप्रमुख मंत्री उदय सामंत ही बैठक घेणार आहेत. यावेळी शिवसेना UBT पक्षातील काही उपशाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याने हा ठाकरे गटाला धक्का मानला जातोय.
Rupali Chakankar News : सुप्रिया सुळेंच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या वक्तव्यावर रूपाली चाकणकरांचा पटवारराज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम (पॅटर्न) लागू करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात घोषणा केली. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार विरोध दर्शवताना टीका केली होती. तर ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाची अंमलबजावणी म्हणजे राज्य शिक्षण मंडळ संपूर्णतः बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पटलवार करत टीका केली आहे.
CM Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुंभमेळ्याचा नियोजनाची आढावा घेणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता.23) नाशिक दौऱ्यावर असून ते मुख्यमंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांच नाशिकमध्ये आहेत. यावेळी ते कुंभमेळा नियोजनाची आढावा बैठक घेणार असून त्र्यंबकेश्वरलाही भेट देणार आहेत.
Supreme Court News : न्या.यशवंत वर्मांची चौकशी होणार? सर्वोच्च न्यायालयाकडूनच जळालेल्या नोटांचा व्हिडिओ शेअरदिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आल्याचा आरोप झाला होता. तर लागलेल्या आगीत मोठी रक्कम जळाली होती. त्याचा व्हिडिओ सर्वोच्च न्यायालयाकडूनच शेअर करण्यात आला असून न्या.यशवंत वर्मांची चौकशी आता केली जाणार आहे. त्यामुळे सध्या न्या. वर्मा यांना कोणतेही न्यायालयीने काम देऊ नये, असे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आदेश दिले आहेत.
Shivsena Split News : 'शिवसेना फुटीवेळी सगळे शांत का?' अनिल परबांनी स्पष्टच सांगितलंशिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या रुपानं वादळ आलं आणि उभ्या शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यावेळी जर मोठे जन आंदोलन उभे झाले असते. तर दबाव निर्माण झाला असता. पण त्यावेळी आंदोलन आणि राडे झाले नाहीत. यावरून अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. यावर आता अनिल परब यांनी खुलासा करताना स्पष्टीकरण दिलंय. एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी उद्धव ठाकरेंच्या आदेशानं शांत बसलो होतो अन्यथा भुजबळ, राणेंवेळी झाले तसे राडे झाले असते, असे त्यांनी म्हटलं आहे.
Nagpur Violence News : नागपूर हिंसाचार : महिला पोलिसाचा विनयभंग? CM देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासानागपूर हिंसाचार प्रकरणामुळे राज्यात मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. यातच दंगेखोरांनी महिला पोलिसांचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला. हा आरोप स्वतः पोलिसांनीच केला होता. पण आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. त्यांनी, महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही. तर तिच्यावर दगडफेक झाल्याचे म्हटलं आहे. यामुळे आता नवा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.