रायगड मध्ये समुद्रात बुडून महिला सरकारी अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू
Webdunia Marathi March 24, 2025 06:45 PM

महाराष्ट्रातील रायगड मध्ये समुद्रात बुडून एका महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सदर घटना हरिहरेश्वर समुद्राच्या किनाऱ्यावर सहली दरम्यान घडली. पल्लवी सरोदे तिच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत सहलीसाठी हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. समुद्रात शिरली असताना जोरदार लाटा आल्या आणि त्यात ती वाहून गेली आणि तिचा बुडून मृत्यू झाला. प्रशासकीय अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे.

ALSO READ:

वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मयत पल्लवी सरोदे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या वैयक्तिक सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून काम करत करत होती. सहकाऱ्यांसोबत हरिहरेश्वर समुद्राच्या किनाऱ्यावर सहलीसाठी गेली असताना समुद्राच्या लाटात वाहून गेली आणि बुडून तिचा मृत्यू झाला.

ALSO READ:

अपघातांनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांचा शोध सुरु केला आणि काही वेळाने तिचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आला.या अपघातामुळे ठाणे जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Edited By - Priya Dixit

ALSO READ:


© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.