आयपीएस तनुश्री लग्नानंतरही कुटुंब आणि संसाराचा उत्तमपणे बॅलन्स सांभाळत पाहिलेलं प्रशासकीय सेवेचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले.
तनुश्री यांंनी अफाट जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी 2016 मध्ये यूपीएससी क्रॅक केली. 2017 मध्ये आयपीएस अधिकारी झाल्या.
महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी काश्मीरमधील राज्य तपास संस्थेत एसपी म्हणून कार्यरत राहिल्या आहेत.
तनुश्री या मूळच्या बिहारच्या असून त्यांचा जन्म 24 एप्रिल 1987 रोजी मोतीहारी या गावी झाला.
लहानपणापासूनच तनुश्री यांना शिस्त आणि देशसेवेची प्रेरणा सीआरपीएफमध्ये डीआयजी पदावर असलेल्या वडिलांकडून मिळाली.
यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू
दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून इतिहास विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती.
सीआरपीएफमध्ये कमांडंट असलेल्या मोठी बहीण मनूश्री यांच्याकडून आयपीएस होण्याची प्रेरणा मिळाली.
सोशल मीडियावरही प्रचंड क्रेझ असलेल्या आयपीएस अधिकारी म्हणून तनुश्री यांची ओळख आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे 1.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.