सरकारी रेल्वे कंपनीकडून Quadrant Future Tek ला मिळाली कोट्यवधींची ऑर्डर, शेअर्सवर असेल लक्ष
ET Marathi March 27, 2025 01:45 PM
Quadrant Future Tek Ltd Stock In Focus : शेअर बाजारात अनेक कंपन्या आपल्या घडामोडींमुळे चर्चेत असतात. काल बाजार बंद झाल्यानंतर क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कंपनीला नवरत्न रेल्वे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी रेलटेल कॉर्पोरेशनकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला कवच सिस्टम बसवण्याची ऑर्डर मिळाला आहे. बुधवारी ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर तीन टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाला. कंपनीला मिळालेली ऑर्डर १५५.९३ कोटी रुपयेक्वाड्रंट फ्युचर टेकच्या नियामक फाइलिंगनुसार, या ऑर्डरची एकूण किंमत १५५.९३ कोटी रुपये असून यामध्ये कर देखील समाविष्ट आहेत. या प्रकल्पांतर्गत क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेड पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे नेटवर्कवर 'कवच' प्रणाली पुरवठा, इंन्स्टॉलेशन आणि कार्यान्वित करेल. हे काम ५०२.२ रुट किलोमीटर (RKM) लांबीच्या रेल्वे ट्रॅकवर केले जाईल आणि ७१ रेल्वे स्थानके त्याच्या कार्यक्षेत्रात येतील. हा संपूर्ण प्रकल्प २१ महिन्यांत पूर्ण करायचा आहे. कंपनीचा महसूल ३१ टक्क्यांनी कमी३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत क्वाड्रंट फ्युचर टेकचा महसूल ३१ टक्क्यांनी घसरून ३९.६३ कोटी रुपये झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो २७.०३ कोटी रुपये होता. कंपनीला या तिमाहीत १.७४ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग तोटा सहन करावा लागला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये ते ३.१७ कोटी रुपये होते. कंपनीचा निव्वळ नफा १३७.३६ टक्क्यांनी वाढून ८.५४ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ते ३.५६ कोटी रुपये होते. कंपनीच्या शेअरमध्ये ३.५२ टक्क्यांची घसरणबुधवारी ट्रेडिंग सत्रादरम्यान, क्वाड्रंट फ्युचर टेकचा शेअर ३.५२% किंवा १८.९० अंकांच्या घसरणीसह ५१७.५५ रुपयांवर बंद झाला. एनएसई वर क्वाड्रंट फ्युचर टेकचा शेअर ४.२९% किंवा २२.९५ अंकांनी घसरून ५१२.६० रुपयांवर आला. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७४४ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ३६२.१० रुपये आहे. कंपनीचा आयपीओ या वर्षी जानेवारीमध्ये आला आणि बीएसई आणि एनएसईवर २९ टक्क्यांनी सूचीबद्ध झाला. आयपीओपासून कंपनीच्या शेअरने १५.४५% परतावा दिला आहे.