आयपीएलच्या 18 व्या मोसमाला (IPL 2025) 22 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या मोसमातील चौथा सामना सोमवारी 24 मार्च रोजी पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. दिल्ली कॅपिट्ल्सने रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्लीवर 1 विकेटने मात करत विजयी सुरुवात केली. या 4 सामन्यानंतर ऑरेंज कॅप कोणत्या फलंदाजाकडे आहे? तसेच या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये कोणते खेळाडू आहेत? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5 फलंदाजांमध्ये 2 भारतीय आणि 3 परदेशी खेळाडू आहेत. या 5 फलंदाजांपैकी 4 खेळाडू हे 2 संघांचे आहेत. सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांचे प्रत्येकी 2-2 खेळाडू आहेत. तर राजस्थान रॉयल्सच्या एकाचा टॉप 5 फलंदाजांमध्ये समावेश आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सनरायजर्स हैदराबादच्या ईशान किशन याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. तर त्यानंतर निकोलस पूरन, मिचेल मार्श, ध्रुव जुरेल आणि ट्रेव्हिस हेड हे टॉप 5 मध्ये आहेत.
ईशान किशनने या हंगामातील एकमेव सामन्यात 106 धावा केल्या आहेत. ईशाने रविवारी 23 मार्चला राजस्थानविरुद्ध शतकी खेळी केली. ईशाने 47 बॉलमध्ये 106 रन्स केल्या. ईशाने 225.53 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. ईशाने या खेळीत 11 चौकार आणि 6 षटकार लगावले. ईशानने केलेल्या खेळीच्या जोरावर हैदराबादने 286 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादने या सामन्यात राजस्थानवर 44 धावांनी विजय मिळवला.
लखनौ सुपर जायंट्सचा निकोलस पूरन दुसर्या स्थानी आहे. पूरनने दिल्ली कॅपिट्ल्सविरुद्ध 75 धावा केल्या. पूरनने दिल्लीविरुद्ध 250 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. पूरनने या खेळीत 6 चौकार आणि 7 षटकार लगावले.
तिसऱ्या स्थानी लखनौचाच फलंदाज मिचेल मार्श आहे. मार्शने 200 च्या स्ट्राईक रेटने 36 बॉलमध्ये 72 रन्स केल्या. मार्शने या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार लगावले. मार्श आणि पूरन या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर लखनौने दिल्लीविरुद्ध 209 धावा केल्या. मात्र त्यानंतरही लखनौला जिंकता आलं नाही. दिल्लीने या सामन्यात 1 विकेटने विजय मिळवला.
B एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकुर आणि रवी बिश्नोई.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : जेक फ्रेझर-मॅकगुर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा आणि मुकेश कुमार.