पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान या दौऱ्यात न्यूझीलंडविरुद्ध टी 20I मालिका खेळत आहे. पाकिस्तान या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. यजमान न्यूझीलंडने चौथ्या सामन्यासह मालिका जिंकली. आता पाचव्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. न्यूझीलंड या अंतिम सामन्यात विजयी चौकार लगावण्यसाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा हा सामना जिंकून मालिकेतील शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. खुशदिल शाह याची कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे अंतिम सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्याचं आव्हानही पाकिस्तानसमोर असणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामना बुधवारी 26 मार्च रोजी होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामना स्काय स्टेडियम, वेलिंग्टन येथे होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 5 वाजून 45 मिनिटांनी टॉस होईल.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल. पाकिस्तान क्रिकेट टीम: मोहम्मद हारिस (विकेटकीपर), हसन नवाज, सलमान आगा (कर्णधार), इरफान खान, शादाब खान, खुशदिल शाह, अब्दुल समद, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, अबरार अहमद, उस्मान खान, मोहम्मद अली, सुफियान मुकीम, जहांदाद खान आणि ओमिर युसूफ.
न्यूझीलंड क्रिकेट टीम : टिम सेफर्ट, फिन ऍलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कॅप्टन), झकरी फॉल्केस, ईश सोधी, जेकब डफी, विल्यम ओरोरके, काइल जेमिसन, बेन सीयर्स आणि टिम रॉबिन्सन.