Dividend Stocks : औषध कंपनीने जाहीर केला 117 रुपये लाभांश जाहीर, ही आहे रेकॉर्ड तारीख
ET Marathi March 26, 2025 11:45 AM
मुंबई : औषध कंपनी सनोफी इंडियाने आपल्या भागधारकांसाठी मोठा लाभांश जाहीर केला आहे. कंपनीने 27 फेब्रुवारी 2025 रोजी चौथ्या तिमाहीच्या निकालांसह 1170% चा अंतिम लाभांश जाहीर केला होता. कंपनीने लाभांशासाठी रेकाॅर्ड तारीख जाहीर केली आहे. सनोफी इंडियाने आर्थिक वर्ष 2024 साठी त्यांच्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 117 रुपयांच्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. हा लाभांश कंपनीच्या 69 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांच्या मंजुरीनंतर दिला जाईल. सनोफी इंडियाने 25 एप्रिल 2025 ही अंतिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून घोषित केली आहे. याचा अर्थ असा की ज्या गुंतवणूकदारांची नावे 25 एप्रिल 2025 रोजी कंपनीच्या रेकॉर्डमध्ये असतील त्यांना या लाभांशाचा लाभ मिळेल.कंपनीने 18 मार्च 2025 रोजी दुसऱ्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले की ज्या गुंतवणूकदारांची नावे 25 एप्रिल 2025 रोजी कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदवली गेली आहेत त्यांना अंतिम लाभांश दिला जाईल. याव्यतिरिक्त, ज्या लाभार्थींची नावे 25 एप्रिल 2025 रोजी कामकाजाची वेळ संपेपर्यंत रेकॉर्डमध्ये असतील त्यांनाही पेमेंट केले जाईल.सनोफी इंडियाने आतापर्यंत 46 वेळा लाभांश जाहीर केला आहे. गेल्या 12 महिन्यांत कंपनीने प्रति शेअर 167 रुपये एकूण लाभांश दिला आहे. मे 2024 मध्ये कंपनीने 117 रुपयांचा अंतिम लाभांश दिला होता. तर 7 मार्च 2024 रोजी 50 रुपयांचा अंतरिम लाभांश दिला होता.सनोफी इंडियाचा शेअर 25 मार्च 2025 रोजी बीएसईवर 3.71% वाढीसह 6,060 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका आठवड्यात या शेअर्समध्ये 5% वाढ झाली आहे. तर दोन आठवड्यात 8% वाढ झाली आहे. मात्र, या वर्षी आतापर्यंत शेअर्सने 0.57% ची घट नोंदवली आहे.