सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला शाही बडदास्त देण्याचे प्रकरण बीड पोलिसांच्या अगंलट आले आहे. खोक्याभाईला खायला बिर्याणी आणि हात धुवायला पाण्याची बाटली देण्याची देण्याच्या कारणावरून दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
Beed Crime Satish Bhosale News : पोलिसांकडून खोक्या भाईची शाही बडदास्त?सतीश भोसले उर्फ खोक्या भाईवर मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल असून सध्या तो तरूणांत आहे. पण याची भाईगिरी येथेही जोमात सुरू असून खोक्या भाईची शाही बडदास्त पोलिसच राखत असल्याचे समोर आले आहे. पोलिसच त्याला खायला बिर्याणी आणि हात धुवायला पाण्याची बाटली देत असून आजुबाजूला नातेवाईकांचा गराडा असणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे आता बीड पोलिसांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय.
Nagpur Violence News : नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तिघांना अटकनागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तिघांना पोलिसांनी अटक केली असून आरोपीची संख्या आता 113 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 12 अल्पवयींनांचा समावेश आहे. या तीनही आरोपींना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून याच्याआधी 36 जणांना देण्यात आलेली पोलीस कोठडी आज संपली आहे. यासर्वांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
kunal kamra News : कॉमेडियन कुणाल कामराचा माफी मागण्यास नकारराज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य करून वादाच्या भोवऱ्यात कॉमेडियन कुणाल कामरा सापडला आहे. त्याच्या स्टुडिओची देखील तोडफोड शिवसैनिकांनी केली आहे. तर त्याने माफी मागावी अशी मागणी शिवसैनिकांची आहे. यावरून कुणाल कामराने आपण माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका घेतली असून याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तर राजकारण्यांची खिल्ली उडवणं कायद्याविरोधात नसल्याची भूमिका ही त्याने घेतली असून तपास यंत्रणा, कोर्टाला सहकार्य करणार असून आपण धमक्यांना घाबरत नसल्याचं कुणाल कामराने म्हटलं आहे.
Prashant Koratkar News : छत्रपतींचा अपमान करणाऱ्या कोरटकरला आज न्यायालयात हजर करणारछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनाही धमकी दिली होती. त्याच्यावर कोल्हापुरात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आज (ता. 25) त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असून तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Ajit Pawar VS Sharad Pawar : राष्ट्रवादी कोणाची? आज सर्वोच्च न्यायालयात होणार निर्णयराज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे अनेकांना धक्का बसला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील अजित पवार यांनी बंडखोरी करत पक्ष फोडला. आता राष्ट्रवादी कोणाची? यावरून कायदेशीर लढाई सुरू असून आज (ता.25) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी दुपारी 12 वाजल्यानंतर होणार असून निर्णय येण्याची शक्यता आहे.