परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांच्या विशेष दूत ज्युली बिशप यांनी घेतली भेट. म्यानमारमधील वेगानं वाढणाऱ्या परिस्थितीवर करण्यात आली चर्चा.
Supreme Court live Updates: सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहेसर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयात म्हटले होते की अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणे, तिचा पायजमा फाडणे आणि तिला पुलाखाली ओढण्याचा प्रयत्न करणे हे बलात्कार किंवा बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत येत नाही.
न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणाला गंभीर संबोधले असून, निर्णय देणाऱ्या न्यायाधीशाच्या असंवेदनशीलतेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
Delhi Live : संसदेत 'छावा'चे स्क्रिनिंग लांबणीवरसंसदेत 27 मार्च रोजी 'छावा'चे स्क्रिनिंग होणार होते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तसेच अनेक मंत्री उपस्थित राहणार होते. पण आता स्क्रिनिंग लांबणीवर पडले आहे.
Sanjaya Raut Live : कुणाल कामराने सर्वच नेत्यांवर व्यंग्य केले आहे - संजय राऊतजर कोणी टीका करत असेल तर ते ती समाज तोडण्याची भाषा कशी होऊ शकते? असा सवाल करत संजय राऊत यांनी कुणाल कामराची पाठराखण केली आहे. राऊत म्हणाले की कामराने सर्वच नेत्यांवर व्यंग्य केले आहे.
Eknath khadase Live : विरोधी पक्षनेता निवड सरकार मुद्दाम होऊ देत नाही, एकनाथ खडसेंचा आरोपविरोधी पक्षनेता निवड सरकार मुद्दाम होऊ देत नाही, त्यामुळे अधिवेशन वाया गेले असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
Pune Live : शाळांच्या परीक्षा सकाळच्याच सत्रात; उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाची खबरदारीराज्यात उष्णतेची लाट येत असून त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल आणि वनविभागाने जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शाळांच्या परीक्षा सकाळच्याच सत्रात घेण्यात याव्यात, परिस्थितीनुसार शाळांना सुट्टी द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Nashik Live : २ लाख १० हजारांची लाच स्वीकारताना गटविकास अधिकाऱ्याला अटकमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे थकीत 2 कोटी 32 लाख 30 हजार रुपयांची बिल काढण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याची घटना घडली आहे. यांपैकी 2 लाख 10 हजारांची लाच स्वीकारताना सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश गोकुळ पोतदार यांना ACB नं रंगेहाथ पकडलं. लाच स्वीकारताना सुरगाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्यानं सुरगाण्यात खळबळ उडाली.
Mumbai Live : बाबाजानी दुर्राणीच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध एसआयटी मार्फत चौकशी होणारपरभणी जिल्ह्यातील पाथरी येथे शासकीय सर्व्हिस रोडच्या जागेवर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता उभारलेल्या संकुलावर कारवाई करण्याची मागणी करत आमदार साजिद खान पठाण यांनी विधिमंडळ सभागृहात लक्षवेधी लावली. या प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी बाबाजानी आणि टीमची बरीच अनधिकृत प्रकरणे समोर येत असून हा आकडा तीस प्रकरणांच्या जवळपास असल्याचे नमूद करीत या सर्व प्रकरणांची चौकशी आता एसआयटी नेमणूक करणार असल्याची घोषणा केली.
Nagpur Riots : टीव्ही डीबेटवर नागपूर दंगलीबाबत पक्षाची बाजू मांडल्याने भाजप प्रवक्त्यांना जीवे मारण्याची धमकीनागपूर : टीव्ही डीबेटवर नागपूर दंगलीबाबत पक्षाची बाजू मांडल्याने भाजप प्रवक्ते यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजय पाठक यांना सिरीयावरून जीवे मारण्याची धमकी मिळालीये. अजय पाठक यांच्याकडून नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Beed News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोर आज होणारसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये झाली होती. यानंतर एसआयटीकडून एक अर्ज करण्यात आला होता, की संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज न्यायालयाऐवजी बीड न्यायालयात चालवावा आणि अर्जाला मंजुरी देत तो खटला बीडमध्ये चालवण्यासाठी विशेष न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आणि आज त्याची पहिली सुनावणी बीड न्यायालयात होत आहे. स्वतः उज्वल निकम आज बीडच्या न्यायालयात हजर राहणारा असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Samsung Company LIVE : सॅमसंग कंपनीला करासाठी केंद्र सरकारने बजावली नोटीसनवी दिल्ली : सॅमसंग कंपनी आणि त्यांच्या भारतातील अधिकाऱ्यांना ६०.१ कोटी डॉलरचा कर भरण्याची नोटीस केंद्र सरकारने दिली आहे. महत्त्वाच्या उपकरणांच्या आयातीवरील आयातशुल्क चुकविल्याबद्दल ही नोटीस देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीने अलीकडच्या काळात एखाद्या कंपनीला पाठविलेली ही सर्वांत मोठी नोटीस आहे. मागच्या वर्षी सॅमसंगला भारतात ९५.५ कोटी डॉलरचा निव्वळ नफा झाला होता.
MP Zia ur Rehman Barq : शाही मशिदीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी संभळच्या खासदाराला उत्तर प्रदेश पोलिसांनी बजावली नोटीस२४ नोव्हेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार, मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान संभळच्या शाही जामा मशिदीत झालेल्या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेश पोलिसांनी संभळचे खासदार झिया उर रहमान बरक यांना नोटीस बजावली आहे.
सांगली : अमली पदार्थांविरोधात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्सने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून इस्लामपूरजवळील ओझर्डे ते घबकवाडी रस्त्यावरील कुंभार वस्ती परिसरातून ८ लाख ४० हजार २५० रुपयांचा २७ किलो ९२५ ग्रॅम गांजा एलसीबीच्या पथकाने जप्त केला. दरम्यान, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. सुनील रामचंद्र कुंभार (वय २८, ऐतवडे खुर्द, ता. वाळवा), सुजय बबन खोत (३४, खोत मळा, आष्टा) आणि परशुराम सिद्धलिंग पोळ (३४, पोळ गल्ली आष्टा) अशी संशयितांची नावे आहेत.
Bijapur Municipal Corporation LIVE : विजापूर महापालिकेतील सर्व ३५ सदस्य अपात्रबंगळूर : विजापूर महानगरपालिकेतील सर्व ३५ सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यात भाजप (१७), काँग्रेस (१०), धजद (१), एआयएमआयएम (२), अपक्ष (५) सदस्यांना २४ मार्च रोजी मालमत्ता जाहीर न केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात आले. कायद्यानुसार कोणत्याही सदस्याने त्यांची मालमत्ता जाहीर केलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले. प्रादेशिक आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याच्या मते विजापूर महानगरपालिकेच्या नव्याने निवडणुका होण्याची शक्यता आहे.
Prashant Koratkar LIVE : तेलंगणमधून ताब्यात घेतलेल्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडीकोल्हापूर : तेलंगणमधून सोमवारी ताब्यात घेतलेल्या प्रशांत कोरटकरला काल सकाळी अटक करून दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्याला २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणे आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी त्याच्या विरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल आहे.
Saugat- A- Modi LIVE : "रमजान ईदसाठी भाजपकडून लाखो मुस्लिम कुटुंबांना 'सौगात- ए- मोदी' किटचे वाटप करण्यात येणार"Latest Marathi Live Updates 26 March 2025 : तेलंगणमधून सोमवारी ताब्यात घेतलेल्या प्रशांत कोरटकरला काल सकाळी अटक करून दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्याला २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या कथित आक्षेपार्ह विडंबनाबाबत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची बदली झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. या पत्रात सदस्य सचिव विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर या रिक्त पदावर झाली. ‘‘रमजान ईदसाठी मुस्लिमांना भाजपकडून लाखो कुटुंबांना ‘सौगात- ए- मोदी’ किटचे वाटप करण्यात येईल,’’ असे अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सांगितले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोर आज होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत असून काही भागांत पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..