वाकड, ता. २७ : येथील वेदांता सोसायटीत श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन आणि शिवजयंती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने विविध आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अथर्वशीर्ष पठण, भव्य शिवजयंती मिरवणूक आणि संध्याकाळी महाआरती पार पडली. महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमांचा समारोप झाला. माजी नगरसेवक ॲड. विनायक गायकवाड, राम वाकडकर, स्नेहा कलाटे, स्वराज कलाटे यांच्या उपस्थितीत महाआरती झाली. अध्यक्ष डॉ. सोमनाथ धोंडे, सचिव स्नेहा राव, कोषाध्यक्ष प्रमोद भोसले, सदस्य सुमंत देशपांडे, विनायक कदम, पराग रुद्रवार, शंतनू देशमुख, निखिल मुळे आदींसह वेदांता सोसायटीतील सर्व रहिवाशांनी विशेष परिश्रम घेतले.
WKD25A08321