चिंचवड, ता.२७ ः केशवनगर येथील गोयल गरिमा हॉलमध्ये वुई टुगेदर फाउंडेशनच्यावतीने जागतिक आरोग्य दिन सप्ताहानिमित्त आयुर्वेद माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. वैद्य गीतांजली क्षीरसागर यांनी आयुर्वेद,पंचकर्म,आहार मार्गदर्शन आणि व्यायामाचे महत्त्व यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी तीन लकी ड्रॉ विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सलीम सय्यद, मंगला डोळे-सपकाळे, दिलीप चक्रे, रवींद्र सागडे, अनिल पाटोळे, रवींद्र काळे, अर्जुन पाटोळे, शंकर कुलकर्णी आदींनी मोलाचे योगदान दिले.
फाउंडेशनचे सचिव जयंत कुलकर्णी यांनी आभार मानले.