Crime News : अल्पवयीन मुलीवर सामाईक अतिप्रसंग
esakal March 28, 2025 07:45 AM

ओझरता- ओझर पोलीस ठाणे येथे फिर्यादीने फिर्याद दिली की, शिरसगाव चौकी ओझर शिवार ओझर ता निफाड येथे फिर्यादी यांचे घरी एका अल्पवयीन पीडीत मुलीवर एक अल्पवयीन मुलगा व त्याचे इतर 04 (अल्पवयीन) मित्रांनी अतीप्रसंग केला म्हणुन गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयांचा तपास परिक्षेत्र पोलीस उपअधिक्षक अद्विता शिंदे यांचेकडे होता.

याबाबत सदर गुन्हयांचा सखोल तपास करत अद्विता शिंदे व एलसीबीचे अधिकारी यांनी पिडीतेला विश्वासात घेत विचारले असता पिडीतेने एकाच मुलाने अतिप्रसंग केला असल्याचे सांगितले तपासाची चक्रे जलद गतीने सुरू झाले व ज्याने गुन्हा केला व गुन्हयातील संबधीत अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन ओझर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.सदर प्रकार सामुहिक अतिप्रसंग नसल्याचे स्पष्ट झाले असून गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन अधिक चौकशी करत आहे

नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने,अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर,उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामिण हरीष खेडकर यांनी मार्गदर्शन व दिलेल्या सुचना प्रमाणे परि उप अधीक्षक अद्विता शिंदे प्रभारी अधिकारी ओझर पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक राजु सुर्वे स्थानीक गुन्हे शाखा यांनी दि. 26/3/2025 परि उप अधीक्षक अद्विता शिंदे प्रभारी अधिकारी ओझर पोलीस स्टेशन,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार गरुड,सहाय्यक पोलीस निरीक्षक निलिमा डोळस,सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा अरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव,ओझर पोलीस स्टेशनचे पोहवा चेतन सवंत्सकर,पोहवा दिपक गुंजाळ,पो.हवा विश्वनाथ धारबळे, पोलीस शिपाई जितेंद्र बागुल,नितीन जाधव,राजेद्र डंबाळे,भास्कर जाधव,मालती जाधव,गवळी दहिभाते,अप्पर पोलीस अधिकारी कार्यालयाचे मयुर कांगने,तनपुरे,स्थानीक गुन्हे शाखेचे ASI नवनाथ सानप काकड वाघमोडे देसले नागपुरे जगताप टिळे हेमंत गिलबीले प्रदिप बहीरम गायकवाड यांचे पथकाने अथक परिश्रम घेवुन नमुद गुन्हयांतील अल्पवयीन मुलास 24 तासाच्या आत ताब्यात घेवुन गुन्हा उघडकिस आणला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.