Maharashtra News Live Updates: लातूरमध्ये कलतानी पोत्याच्या बारदाना गोडाऊनला भीषण आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान
Saam TV March 29, 2025 08:45 PM
अमवस्येनिमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातल्या शनीमांडळ येथे दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी

आज शनी आमवस्ये निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातल्या शनीमांडळ येथे दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले आहे.

याठिकाणी दर्शनाने साडेसातीचे शमन होते अशी धारणा असल्याने याठिकाणी भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करत असतात.

मकर राशीतून आज शनी मेष राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे याठिकाणी दर्शनासाठी रांगाला लागल्याचे पहावयास मिळाले.

आज शनिआमवस्ये निमित्ताने याठिकाणी भाकरी, भात, पिठल्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या गावातील गावकरी घरातून दोन भाकरीकरुन प्रसादाठिकाणी वाटपासाठी आणतात.

Latur: लातूरमध्ये कलतानी पोत्याच्या बारदाना गोडाऊनला भीषण आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान

लातूर बार्शी महामार्गावरच्या पाच नंबर परिसरात भीषण आग लागली आहे..या भागातील कलतानी पोत्याच्या बारदाना गोडाऊनला ही भीषण आग लागली आहे...

आगीत लाखो रुपयाचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे..

तर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीची प्रयत्न सुरू आहेत.,

आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याने परिसरात भीतीच वातावरण पसरलं आहे..

उदय सामंतउशिरा का होईना आता सगळ्यांना कळू लागले की हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना कोणाची आहे.. Wardha: ‘एसटी’ने फुकट्यांना दाखविला इंगा; २०७ प्रवाशांना २३ हजारांचा दंड

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परिवहन महामंडळाकडून विविध सेवा सुविधा दिल्या जातात;

मात्र या सुविधांच्या अडूनदेखील अनेकजण गर्दीचा फायदा घेत फुकटात प्रवास करण्याचे धाडस करतात.

अशा फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाकडून स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान १० हजारांवर बसची तपासणी करण्यात आली. यामध्ये २०७ फुकटे प्रवासी आढळून आले.

लाडकी बहीण योजना आणि विविध योजनांमुळे शेतीत काम करण्यासाठी सालगडी आणि मजूर मिळेना

लाडकी बहीण योजना आणि इतर योजना सरकारने राबविल्या आणि याचाच फटका मात्र शेतकऱ्यांना बसतोय शेतीत काम करण्यासाठी सालगडी आणि मजूर मिळत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी आणि त्याच साल ठरवल्या जातं.परंतु लाख, दीड लाख रुपये साल (वर्ष )दिले तरी सालगाडी शेतात काम करण्यासाठी मिळतं नसल्याने शेतकरी पाडव्याच्या मुहूर्तावर सालगडाच्या शोधात आहेत. दाम दुप्पट पैसे देऊनही सालगडी आणि शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यानी दिली.

ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपींवर मकोका लावा :तुळजापुर महाविकास आघाडीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

ड्रग्ज तस्करी प्रकरणात अगोदर ही कारवाई केली आणि आताही कडक कारवाई करणार:मुख्यमंत्री देवेंद्र यांची माहीती

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात राजकीय पक्षांशी संबधित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली मागणी

Dharashiv: तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणाची चौकशी एसआयटीद्वारे करा - मुख्यमंत्री

धाराशिव:

तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणात एसआयटी नेमुन प्रकरणाची सखोल चौकशी करा

ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपींवर मकोका लावा :तुळजापुर महाविकास आघाडीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

ड्रग्ज तस्करी प्रकरणात अगोदर ही कारवाई केली आणि आताही कडक कारवाई करणार:मुख्यमंत्री देवेंद्र यांची माहीती

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात राजकीय पक्षांशी संबधित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली मागणी

Buldhana News: स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांना जामीन मंजूर

बुलडाणा -

स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांना जामीन मंजूर, कारागृहा बाहेर येताच कार्यकर्त्यांनी हार घालून केला सत्कार

राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल केल्याचा प्रशांत डिक्कर यांचा आरोप

Kolhapur News: कोल्हापूरातील गावगुंडांकडून हॉटेल सागरीमध्ये राडा, वेटर आणि मॅनेजरला मारहाण

कोल्हापूर जिल्ह्यातील गावगुंडांकडून हॉटेल सागरीमध्ये राडा

फुकट दारू पिऊन गावगुंडानी केली वेटर, मॅनेजरला मारहाण

हॉटेलची तोडफोड आणि मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कैद

प्रत्येक आठवड्याला हॉटेलमध्ये येऊन फुकट दारू पिऊन दहशत निर्माण करण्याचा गावगुंड करत होते प्रयत्न

ओमकार शिंदे, आदित्य नावाच्या गावगुंडांसह इतर 8 गावगुंडांनी केली हॉटेलची तोडफोड

प्रगती विद्यामंदिर शाळेत अनोखा पुस्तकांचा दवाखाना

विद्यार्थ्यांना पुस्तकाचे महत्व समजावे व विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजावी या उद्देशाने प्रगती विद्यामंदिर शाळेत उपक्रमशील शिक्षक मनोज भालेराव यांच्या संकल्पनेतून पुस्तकांचा दवाखाना' हा अनोखा उपक्रम राबविण्यात आलाय.

Maharashtra News Live Updates: तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मंजुरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

विकास आराखड्याला मंजुरी, काही टेकनिकल गोष्टी बाकी; मुख्यमंत्र्यांची माहिती,

मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भूसंपादनाच्या कामाला वेग देण्याच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून सूचना

मंदिर संस्थान कडून तयार करण्यात आलेले सादरीकरण मुख्यमंत्र्यांनी पाहिल्यानंतर सूचना

भूसंपादनाचे काम वेगाने झाल्यानंतर आराखड्यातील कामाला गती मिळेल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचा मान सन्मान आम्ही ठेवू

Dharashiv News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजाभवानी मंदीरात दाखल, तुळजाभवानी मातेची करणार महाआरती

धाराशिव:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजाभवानी मंदीरात दाखल- तुळजाभवानी मातेची करणार महाआरती

मंदीरातील जिर्णोद्धार कामाची करणार पाहणी -

तुळजाभवानी मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पञकारांना पोलिसांनी रोखले - मंदीरात जाण्यास पञकारांना मज्जाव

तुळजाभवानी मंदीराच्या राजे शहाजी महाराज प्रवेशद्वारावरच रोखले -

Solapur News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सोलापूर विमानतळावर आगमन

सोलापूर ब्रेकिंग -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सोलापूर विमानतळावर आगमन

मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस आले आहेत सोलापूर दौऱ्यावर

सोलापूर विमानतळावर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचं केलं स्वागत

सोलापूरहुन मुख्यमंत्री जाणार तुळजापूरला

तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरला होणार रवाना

Dharashiv News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तुळजापुर शहरात भव्य स्वागत

धाराशिव -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तुळजापुर शहरात भव्य स्वागत

तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून फडणविसांचे भव्य स्वागत

मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच धाराशिव दौऱ्यावर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे घेणार दर्शन

Malegaon News: मालेगावात होणाऱ्या हिंदू साहित्य संमेलनास साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उपस्थित राहण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी

- मालेगावात होणाऱ्या हिंदू साहित्य संमेलनास व साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उपस्थित राहण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

- सालाबादाप्रमाणे गुढीपाडवा नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मालेगावात होते हिंदू साहित्य संमेलन...

- मात्र या वर्षी नागपूर दंगलीचे कारण देत पोलिसांनी या कार्यक्रमाला नाकारली होती परवानगी..

- कार्यक्रमाला नाकारलेल्या परवानगी विरोधात हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्त्यांनी घेतली होती उच्च न्यायालयात धाव..

- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची पार्श्वभूमी असणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर देखील हिंदू साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असल्याने संमेलनास विशेष महत्त्व..

Ratnagiri News: वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, रत्नागिरीत शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला

रत्नागिरी- वादळी वाऱ्यासह पावसाच्या इशाऱ्यामुळे शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला

दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

वाऱ्याचा खोल समुद्रातील मासेमारीवर परिणाम

बहुतांश मच्छीमारी बोटी बंदरात उभ्या

जिल्ह्यात अडीच हजार मच्छीमारी बोटी

गेले दोन दिवसांपासून किनारपट्टी भागात ढगाळ हवामान

मच्छीमारीच्या शेवटच्या हंगामात मासेमारी ठप्प झाल्याने बाजारपेठेवरती परिणाम

सुरमई झाली 900 रुपये किलो, मच्छी वरती अवलंबून असणारे छोटे मोठे व्यवसाय ठप्प

मिरकरवाडा, जयगड, साखरी नाटे, हर्णे, पूर्णगड, गुहागर, बंदरात मच्छीमारी बोटी किनाऱ्यालाच

Pune News: उष्णतेच्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यातील शाळा आता सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार

पुणे -

- उष्णतेच्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यातील शाळा आता सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत.

- त्यानुसार सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळांची वेळ सकाळी सात ते सव्वाअकरा, तर माध्यमिक शाळांची वेळ सकाळी सात ते पावणेबारा अशी करण्याचे निर्देश देण्यात आले

- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येतील.

- प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी याबाबतचे संयुक्त परिपत्रक आणि वेळापत्रक प्रसिद्ध केले.

Pune News: पुणे विद्यापठाच्या आवातार विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य, तरुणाची रवानगी पोलिस कोठडीत

पुणे -

- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाला पोलिस कोठडी

- प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी रविवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

- अनिश वसंत गायकवाड असे पोलिस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

- आरोपी गायकवाड याने मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य केल्याची घटना घडली होती.

- विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती

- पोलिसांनी त्याला गुरुवारी रात्री अटक केली

- ⁠विद्यार्थ्यांनी या घटनेनंतर केले होते आंदोलन

Pune News: अजित पवार यांनी जिल्हा बॅंकेसाठी केली जागेची पहाणी

पुणे -

- अजित पवार यांनी जिल्हा बॅंकेसाठी केली जागेची पहाणी

- ⁠पुणे जिल्हा बॅंकेच्या शेजारील जागेची केली पहाणी

Navi Mumbai News: IPL मॅचवर सट्टा लावणाऱ्या टोळीला अटक, नवी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेने केली अटक

नागपूर आणि यवतमाळमधील सट्टेबाज नवी मुंबईतील एका प्रतिष्ठित इमारतीमध्ये घर भाड्याने घेऊन तेथून सट्टेबाजीचे रॅकेट चालवत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे नवी मुंबई गुन्हे शाखेने सानपाडा येथील अखूरथ सोसायटीमध्ये छापा टाकला असता 3 जण राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स मॅच वर सट्टेबाजी करत असताना मिळून आले.

नवी मुंबई गुन्हे शाखेने तीनही आरोपीन विरोधात सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक केली असून सट्टा लावण्यासाठी असलेले 1 लॅपटॉप, 1 टॅब, 11 मोबाईल फोन आणि 1 टीव्ही असे 2 लाख 67 हजाराचे साहित्य पोलीसांनी जप्त केलेय.

Sambhajinagar: औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

- आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती पुण्यतिथी आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी पर्यंत औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी करीत हिंदुत्ववादी संघटनानी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा दिला होता.

- त्या पार्श्वभूमीवर आज सुरक्षा यंत्रणा अधिक अलर्ट झालेली आहे. खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते त्यासोबतच औरंगजेबाची जिथे कबर आहे-

- औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Lonavala News: लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी परिसरात बिबट्याचा वावर

- लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी परिसरात बिबट्याचा वावर

-बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद

-लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी आणि नागफणी सुळका या परिसरात दोन बिबट्यांचा मुक्त संचार दिसून आला आहे.

-तर एक व्यक्ती बिबट्यांची चाहूल लागताच थोडक्यात बचावलाय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

-या भागात बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच स्थानिकांना सावध राहण्याचे आणि रात्री उशिरा घराबाहेर न पडण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

Nandurbar News: आदिवासी विकास विभागाच्या गणवेश खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

114 कोटी रुपयांच्या गणवेश खरेदीची फाईल एकाच दिवसात मंत्रालयात मान्यता आणि पैशांचे वितरण झाल्याचा आरोप...

एक कोटी रुपयाचा वरची खरेदी दर करारानुसार करू नये असा शासनाचा नियम असतानाही तत्कालीन आदिवासी विकास मंत्री यांनी घातला गणवेश खरेदीचा घाट

त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या दहा हजार गाईंची ही चौकशी करण्यात यावी सेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी...

नाव न घेता माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर आरोप...

नंदुरबार जिल्ह्यात भाजपा आमदार विजयकुमार गावित आणि शिंदे गटात रंगणार आरोप प्रत्यारोपांचा खेळ....

Shirdi News: साई मंदिरात व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 या वेळेतच दर्शन द्यावे - सुजय विखे

शिर्डीच्या साई मंदिरात व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 या वेळेतच दर्शन द्यावे.. त्यासाठी साई संस्थाने तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा अशी मागणी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी केली आहे..

Nagpur News: पीएम मोदी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर दौऱ्यावर

- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर दौऱ्यावर असणार आहे.

- माधव नेत्रालयाच्या 5.83 हेक्टर वर असलेल्या विस्तारित 250 बेडेड रुग्णालयाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंगचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. तसेच एकाच मंचावर असण्याचा राम मंदिर नंतरचा हा ऐतिहासिक क्षण असणार आहे.

- माधव नेत्रालयात या निमित्ताने कार्यक्रमाच्या अनुषंगाने जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे..

- त्यासाठी भव्य असा डोम उभारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर विमानतळावर आल्यानंतर सर्वात प्रथम हेडगेवार स्मृती मंदिर येथे जाऊन गोडवलकर गुरुजी आणि हेडगेवार यांच्या स्मृतीला वंदन करतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.