Salman Khan: ईद मुबारक! सलमान खानने चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा,'पठाणी' लूकमध्ये दिसला भाईजान
Saam TV April 01, 2025 05:45 AM

अभिनेता ईदच्या खास मुहूर्तावर त्याच्या चाहत्यांना झलक दाखवली. दरवर्षीप्रमाणे याही वेळी सलमान खानने त्याच्या घराच्या बाल्कनीतून चाहत्यांना झलक दाखवली.

चाहत्यांकडे पाहत हात वरती करत त्यांना अभिवादन केले. सुरक्षेच्या कारणामुळे सलमान खान बुलेटप्रूफ काचेच्या मागे उभे राहून चाहत्यांना झलक दाखवली.

यावेळी सोबत त्याची भाची आयत होती. या क्षणाची अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सलमान खान पठाणी लूकमध्ये दिसला.

ईदच्या खास मुहूर्तावर सलमान खानने चाहत्यांना हात जोडून शुभेच्छा दिल्या. सलमान खानची ही स्टाईल त्याच्या चाहत्यांना खूप आवडत असते.

ईदच्या खास मुहूर्तावर भाईजानसोबत सलमान खानची भाची आयतही दिसली होती. या दोघांचे फोटो इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. सलमान खानने ईदसाठी पांढरा कुर्ता घातला होता.

नेहमी प्रमाणे सलमान खान खूप स्टायलिश आणि डॅशिंग दिसत आहेत. दरम्यान नुकताच सलमान खानचा सिकंदर चित्रपट रिलीज झालाय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.