आपल्या स्वयंपाकघरात वापरले जाणारे अनेक पदार्थ गुणकारी असतात. ज्यामध्ये मेथी दाण्यांचादेखील समावेश आहे. चवीला कडू असणारे मेथी दाणे आरोग्याशी संबंधित अनेक त्रासांपासून आराम देऊ शकतात. कारण मेथी दाण्यांत प्रोटीन, निकोटिनिक ॲसिड, आयर्न, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमसारखे अनेक पोषक तत्व असतात. जे तुमच्या केसांना मजबूत, दाट आणि चमकदार बनवू शकतात. यासाठी मेथीचे पाणी फायदेशीर मानले जाते. चला तर जाणून घेऊया मेथीचे पाणी केसांसाठी कसे फायदेशीर ठरते? (Methi Water Benefits for Hair)
मेथी दाण्यांत हार्मोन्स संतुलित करणाऱ्या अनेक गुणांचा समावेश असतो. त्यामुळे केसगळतीने त्रस्त असाल तर मेथीच्या पाण्याचा वापर नक्की करा. यात आढळणारे प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड हेयर फॉलिकल्सला मजबूत करतात. ज्यामुळे केस तुटणे आणि गळणे कमी होते.
मेथीमध्ये अँटी- फंगल आणि अँटी- बॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे कोणत्याही इन्फेक्शनपासून स्कॅल्पचे रक्षण होते. शिवाय डॅन्ड्रफ, खाज आणि कोरडेपणासारख्या त्रासांना सामोरे जावे लागत नाही. यासाठी नियमित स्वरूपात मेथीच्या पाण्याने केस धुणे फायदेशीर ठरेल.
मेथीच्या बियांमध्ये लेसिथिन मुबलक प्रमाणात आढळते. जे केसांना पोषण देते आणि त्यांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. शिवाय रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत करते. ज्यामुळे नव्या केसांच्या वाढीसाठी प्रोत्साहन मिळते.
मेथीचे पाणी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. ज्याच्या वापराने केस मुलायम, चमकदार आणि दाट होतात. शिवाय केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि नैसर्गिक चमक येते.
मेथीच्या दाण्यांमध्ये आढळणारे अँटी- ऑक्सीडेंट्स आणि आयर्न अकाली केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंद करतात. शिवाय मोठ्या काळापर्यंत केस काळे राहतील याची काळजी घेतात.
साहित्य – 2 ते 3 चमचे मेथी दाणे, 1 कप पाणी
कृती – वाटीभर मेथी दाणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी दाण्यांतील पाणी काढून टाका आणि त्यांची पेस्ट तयार करा. तयार पेस्ट स्कॅल्प आणि केसांना लावून साधारण 30 ते 40 मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाणी आणि रोजच्या वापरातील शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून किमान एकदा या पेस्टचा वापर केल्यास चांगले परिणाम मिळतील.
हेही पहा –