IPOs This Week : नवीन महिन्याच्या सुरूवातीला ३ आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी, ४ कंपन्या सूचीबद्ध होतील
Upcoming IPOs : प्राथमिक बाजारातील रेलचेल मंदावलेली दिसून येत आहे. येत्या नवीन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही कोणताही नवीन आयपीओ उघडणार नाहीये. परंतू आधीच उघडलेल्या आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी असणार आहे. यापैकी २ आयपीओ २ एप्रिल रोजी बंद होतील. तर १ आयपीओ ३ एप्रिल रोजी बंद होईल. तिन्ही आयपीओ एसएमई विभागातील आहेत. याशिवाय या आठवड्यात ४ कंपन्यांचे शेअर्स सूचीबद्ध होणार आहेत.नवीन आठवड्याचे कामकाजाचे दिवस १ एप्रिलपासून सुरू होतील कारण सोमवार, ३१ मार्च रोजी ईद उल-फित्रनिमित्त सुट्टी आहे. ३१ मार्च रोजी २०२४-२५ हे आर्थिक वर्ष देखील संपेल. नवीन आर्थिक वर्ष २०२५-२६ १ एप्रिलपासून सुरू होईल. ३ आयपीओ आधीच उघडले
इन्फोनेटिव्ह सोल्युशन्सचा आयपीओ:हा आयपीओ देखील २८ मार्च रोजी उघडला आणि ३ एप्रिल रोजी बंद झाला. कंपनीला २४.७१ कोटी रुपये उभारायचे आहेत. आयपीओमध्ये ३१.२८ लाख नवीन शेअर्स जारी केले जात आहेत. बोलीसाठी किंमत पट्टा प्रति शेअर ७५-७९ रुपये असून लॉट साईज १६०० शेअर्स इतकी आहे. आतापर्यंत आयपीओ ०.५२ वेळा सबस्क्राइब झाला आहे.आपीओ बंद झाल्यानंतर वाटप ४ एप्रिल रोजी अंतिम केले जाईल. शेअर्स ८ एप्रिल रोजी बीएसई एसएमई वर सूचीबद्ध केले जातील.रेटॅगिओ इंडस्ट्रीजचा आयपीओ: १५.५० कोटी रुपयांचा हा आयपीओ २७ मार्च रोजी उघडला आणि २ एप्रिल रोजी बंद होईल. आतापर्यंत आयपीओला ०.८४ पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. आयपीओमध्ये ६१.९८ लाख नवीन शेअर्स जारी केले जात आहेत. बोलीची किंमत प्रति शेअर २५ रुपये आणि लॉट साईज ६००० आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर शेअर्सचे वाटप ३ एप्रिल रोजी अंतिम केले जाऊ शकते. शेअर्स ७ एप्रिल रोजी बीएसई एसएमई वर सूचीबद्ध केले जाऊ शकतात.
स्पिनारू कमर्शियल आयपीओ: २८ मार्च रोजी उघडलेल्या या आयपीओचा आकार ०.१७ कोटी रुपये आहे. हा आयपीओ आतापर्यंत ०.१६ पट भरला गेला आहे. आयपीओमध्ये १९.९४ लाख नवीन शेअर्स जारी केले जात आहेत. बोली लावण्यासाठी प्रति शेअर ५१ रुपये आणि २००० च्या लॉटमध्ये बोली लावता येते. आयपीओ ३ एप्रिल रोजी बंद होईल. त्यानंतर वाटप ४ एप्रिल रोजी अंतिम केले जाईल. शेअर्स ८ एप्रिल रोजी बीएसई एसएमईवर सूचीबद्ध केले होतील.
या कंपन्या सूचीबद्ध केल्या जातील१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आठवड्यात डेस्को इन्फ्राटेकचे शेअर्स बीएसई एसएमईवर सूचीबद्ध होतील. त्यानंतर, २ एप्रिल रोजी श्री अहिंसा नॅचरल्स आयपीओ आणि एटीसी एनर्जीज आयपीओ एनएसई एसएमईवर सूचीबद्ध होतील. आयडेंटिक्सवेबचे शेअर्स ३ एप्रिल रोजी बीएसई एसएमई वर पदार्पण करतील.