गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 18 व्या मोसमातील नवव्या सामन्यात विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. गुजरातसाठी टॉप 3 फलंदाजांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. मात्र त्यानंतर फलंदाजांना काही खास करता आलं नाही. त्यामुळे गुजरातला 200 पार पोहचण्याची संधी असूनही पोहचता आलं नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी गुजरातला झटपट झटके देत मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात यश मिळवलं. मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांची भूमिका बजावली. त्यानंतर आता सर्व जबाबदारी ही फलंदाजांवर आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेन्ट बोल्ट, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू.