क्लॉक टॉवर सेंटरमध्ये असलेल्या या विशाल सलूनमध्ये १७० खुर्च्या आहेत, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठे सलून बनले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, दररोज १५,००० हून अधिक ग्राहकांना सेवा दिली जाईल. सौदी अरबच्या मक्का शहरातील क्लॉक टॉवर सेंटरमध्ये जगातील सर्वात मोठे सलुन उघडण्यात आले आहे. या इंटरनॅशनल स्टँडर्ड सलुनचा उद्देश्य हज आणि उमराहला येणाऱ्या लोकांना वेगाने आणि चांगली सेवा देणे. हे सलुन सौदी अरबच्या केंद्रीय सलुन झोन विकासाचा एक हिस्सा आहे. या सलुनचा उद्देश्य पवित्र काबा शरीफच्या आजूबाजूच्या परिसराचा विकास करणे आणि तेथे आणखी चांगल्या सुविधा निर्माण करणे हा आहे.
क्लॉक टॉवर सेंटरमध्ये या भव्य सलुनमध्ये १७० चेअर लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे जगातील आतापर्यंतचे सर्वात मोठे सलून बनणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात येथे दर दिवसाला १५००० हून अधिक जास्त ग्राहकांना सेवा दिली जाईल. योजनेनुसार प्रत्येक ग्राहकांना केवळ तीन मिनिटांचे हाय क्वालीटीची सेवा देण्याचा लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
या हाय-कॅपेसिटी आणि एडव्हास टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेल्या सलूनद्वारे हज यात्रेसाठी आलेल्यांना वेगवान, प्रभावी आणि चांगली सेवा प्रदान केली जाणार आहे. मक्केत येणाऱ्या हज यात्रेकरुंच्या दृष्टीने येथे अनेक नवनवीन सेवा सुविधांची सुरुवात केली जात आहे. याशिवाय सौदी अरब सरकारने मक्केत अनेक योजनांवर काम सुरु केले आहे. या सर्वांवर मक्केला आधुनिक आणि चांगल्या सुविधांनी परिपूर्ण करणे आहे. ज्यामुळे हजयात्रेकरुंना कोणत्याही असुविधा होणार नाहीत.