आयपीएल 2025 स्पर्धेतील 9 वा सामना आज (29 मार्च) रोजी खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघ समोरासमोर आहेत. दोन्ही संघांनी हंगामाची सुरुवात पराभवाने केली आहे. मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गुजरातला फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले होते. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या आहेत. तसेच मुंबई समोर जिंकण्यासाठी 197 धावांचं आव्हान उभे केले आहे.
प्रथम फलंदाजी करताना गुजरातसाठी सर्वाधिक धावा साई सुदर्शनने केल्या. त्याने 41 चेंडूत 63 धावा केल्या. त्यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकार झळकावले. त्यानंतर शुबमन गिलने 27 चेंडूत 38 धावा केल्या. तसेच जॉस बटलरने 24 चेंडूत 39 धावा केल्या.
मुंबईसाठी 2 विकेट्स हार्दिक पांड्याने घेतल्या. तसेच बाकी गोलंदाजांनी एक एक विकेट घेतली.
हा सामना गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळला जात आहे. आता मुंबई हे आव्हान पूर्ण करू शकेल का हे पाहणं रंजकतेचे असणार आहे.